Diwali Jhadu

तुम्हाला सहसा माहिती असेलच की, दिवाळीच्या दिवशी झाडूची खरेदी करणं अगदी शुभाशुभ मानलं जातं. अर्थात असं की, जर घरात झाडू असेल तर म्हटलं जातं की, दारिद्रय घराला स्पर्श करत नाही. घराच्या वास्तू रचनेत जर काही दोष असतील तर त्याचेही निराकरण होते.

धार्मिकतेच्या जुन्या रूढी परंपरा मान्यतेनुसार झाडू या महत्त्वाच्या उपयोगी साधनाचा आपण अवमान करता कामा नये. जर यदाकदाचित असं झालं तर म्हटलं जातं की, आपल्या घराची लक्ष्मी रूसल्या जाते. झाडूला शक्यतो लपवून उत्तर दिशेला तोंड करत ठेवल्या गेलं पाहिजे.

कारण घरात झाडूला असं सहज इतरत्र मोकळे ठेवणे अपशकुन मानला जातो. घराच्या मुख्य दारात तर झाडू कदापि ठेवू नये. आणि अनेकदा झाडूला उभेही ठेवल्या नाही गेले पाहिजे. पुजापाठ घर, भंडारघरात कधीही झाडूला ठेवू नये. आणि चुकून जर कधी झाडू तुमच्याकडून बेडरूमच्या खोलीत राहू लागला असेल, तर वेळीच लक्ष द्या आणि त्याचा प्रबंध दुसरीकडे करा कारण झाडूच्या खोलीत राहण्याने तुमच्या वैवाहिक जीवनात तणाव सुरू होऊ शकतात.

सोबतच खुप जुन्या झालेल्या झाडूला घरात शक्यतो ठेवूच नये. जर नव्या झाडूची खरेदी करायची असेल तर ती “शनीवार” या दिवशीच करावी. झाडूला आपण चुकून ओलांडून जातो अनेकदा, तेही अर्थात योग्य नाहीये. झाडूला अशा प्रकारे ओलांडल्याने लक्ष्मी नाराज होते.

नव्या घरात झाडूच्या प्रवेशाने घरात कधीच दारिद्रयता येत नाही, याची नोंद अवश्य ठेवायला हवी.