मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्तीचा मंत्रिमंडळाचा निर्णय राजभवनावर मंजुरीच्या प्रतिक्षेत असतानाच आता या प्रकरणात नवीन वळण आले आहे. आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यातील प्रलंबित विधानपरिषद निवडणुका तातडीने घेण्याची विनंती केली आहे. राज्यपाल कार्यालयाने याबाबतचे माहिती ट्वीटर वरून दिली आहे. यात त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
Press Release pic.twitter.com/OaEMcXnKny
— Governor of Maharashtra (@maha_governor) April 30, 2020
प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय कि राज्यपाल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्यातील प्रलंबित ९ जागांच्या विधान परिषद निवडणुका घ्याव्यात अशी विनंती केली आहे. तसेच त्यांनी आपल्या विनंतीत राज्यात अस्थिरतेची जी परिस्थिती आहे त्याबद्दलही आयोगाला माहिती दिली आहे.
केंद्र सरकारने अनेक बाबींना लॉक डाऊनमधून सवलत दिली आहे याचाही त्यांनी पत्रात उल्लेख केला आहे तसेच उद्धव ठाकरेंना २७ मे पूर्वी आमदार होणे गरजेचं असल्याचही त्यांनी नमूद केलं आहे.