मराठी मालिकांना प्रेक्षकांनी नेहमीच उत्कृष्ट प्रतिसाद दिलेला आहे. अशीच एक मराठी मालिका अग्गबाई सासुबाई या मालिकेच्या बाबतीत देखील सध्या हेच घडत आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झालेली आहे. एका एका विशिष्ट विषयाच्या पलीकडे जाऊन या या मालिकेमध्ये नवीन विषयाला हात घातलेला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.

या मालिकेमध्ये अभिजीत राजे यांची भूमिका केली आहे प्रसिद्ध सिनेअभिनेते गिरीश ओक यांनी. त्यांच्या अभिनयातील सहजता, देहबोली, शब्दफेक आणि हावभाव यामुळे त्यांनी या भूमिकेत प्राण निर्माण केला आहे. मराठीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केलेल आहे. आज या लेखाच्या माध्यमातून आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती जाणून घेऊयात.

गिरीश ओक मूळचे नागपूरचे असून त्यांचे प्राथमिक शिक्षण देखील नागपूर येथेच झालेले आहे. त्यानंतर त्यांनी मेडिकलची डिग्री देखील प्राप्त केली आहे. ते व्यवसायाने एक डॉक्टर जरी असले तरी अभिनयाची आवड असल्यामुळे त्यांनी सिनेसृष्टीत आपलं करियर करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी 1994 साली रंगभूमीवर युटर्न या नाटका मार्फत पाऊल ठेवलं. त्यानंतर कुसुम मनोहर लेले, श्री तशी सौ, कहानी में ट्विस्ट अशी अनेक नाटके देखील त्यांनी गाजवली. त्याबरोबरच त्यांना अनेक मालिकांमध्ये देखील संधी मिळाली. त्यापैकी दामिनी, बंदिनी, दुहेरी, जुळून येती रेशीमगाठी, अग्निहोत्र यासारख्या लोकप्रिय मालिकेत त्यांनी काम देखील केलेल आहे.

गिरीश ओक यांची दोन लग्न झालेली आहेत. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पद्मश्री पाठक असे आहे तर दुसऱ्या पत्नीचे नाव पल्लवी पाठक असे आहे. गिरीश ओक यांचे दुसरे लग्न 23 मार्च 2008 मध्ये झाले आहे. गिरीश ओक त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोबत ठाण्यात राहतात. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून दुर्गा नावाची एक मुलगी देखील आहे. जी सध्या लंडनमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे.

सिनेसृष्टीत काम करत असताना त्यांनी पद्मश्री पाठक यांच्याशी विवाह केला या दोघांना एक मुलगी देखील आहे जी सिनेसृष्टीत तिच्या अभिनयासाठी तसेच सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे ती मुलगी प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले होय.

गिरिजा चा जन्म 27 डिसेंबर 1987 साली नागपूर मध्ये झाला. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ती रुपेरी पडद्यावर ती वावरत आहे. मुख्य अभिनेत्री म्हणून तिने लज्जा या मराठी मालिकेतून पदार्पण केले. या मालिकेत मुक्ता बर्वे, तेजश्री प्रधान यांच्यासोबत देखील काम केलेल आहे.

गिरीजाने अनेक मराठी, हिंदी, कन्नड चित्रपटांमध्ये काम केलेल आहे. याचबरोबर तिचे मालिका तसेच जाहिरातीमधील काम देखील प्रसिद्ध आहे.

गिरीजा सध्या लेडीज स्पेशल हिंदी सिरियल मुळे खूप चर्चेत आलेली आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्येही काम केलेल आहे.”तारे जमीन पर” या चित्रपटात तिने आमिर खान सोबत देखील काम केलेल आहे. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये शोर इन द सिटी, सायकल किक अशा विविध चित्रपटांमध्ये काम केले आहे.

2011 ला गिरी शजाने सुहरूद गोडबोले याच्यासोबत लग्न केले. तोदेखील कलाक्षेत्रातच काम करत असतो. गिरिजा आणि सुहरुद या दोघांना 17 मे 2013 रोजी एक मुलगा झाला. त्याचे नाव कबीर असे आहे. गिरीश ओक यांचे दुसरे लग्न गिरिजा हिच्या लग्नाच्या आधी झाले होते.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.