मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते वर्षा उसगांवकर यांना ‘कृतज्ञता पुरस्कार’ प्रदान
अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली विशेष ओळख निर्माण केली. लपंडाव, एक होता विदुषक, खलनायिका, सवत माझी लाडकी, शुभमंगल सावधान, माल मसाला, रंग प्रेमाचा, गंमत-जमंत, दुनियादारी आदी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी काम केले आहे.
‘९व्या गोवा मराठी फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते ‘कृतज्ञता पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यावेळी दिग्दर्शक-निर्माते संजय लीला भंसाळी उपस्थित होते.
वर्षा उसगांवकर यांचा जन्म गोव्यामध्ये झाला त्यामुळे गोवेकरांना या गोष्टीचा नक्कीच अभिमान असेल. सिने रसिक प्रेक्षकांनी नेहमीच वर्षा उसगांवकर यांच्या चित्रपटांना आणि त्यांच्या अभिनयाला भरभरुन प्रतिसाद दिला आणि पुढेही देतील.