फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलीवुडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामूळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलीवुड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावले आहे.
सनी लियोनीनंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दूस-या क्रमांकावर आहे. फेसबुकवर 9.8 मिलीयन फोलोवर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनचे फोटो आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आहे. आणि त्यामूळेच 73.22 गुणांसह अनुष्का, दूसरी मोस्ट एंगेजिंग बॉलीवुड एक्टेस झाली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया ह्या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.
सनी लियोनीचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीयोज, तसेच आपल्या कुटूंबियांसोबतच फोटो, आपल्या स्टाइलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीयो ह्यामूळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाउंटवर एंगेजमेंन्ट वाढलेली दिसून आलीय. अनुष्काच्या भूतान ट्रिपच्या फोटोंना तिच्या आणि विराटच्या चाहत्यांची पसंती मिळालेली दिसून आलीय.
फेसुबकवर 40 मिलीयन फ़ॉलोअर्स असलेल्या प्रियंका चोपडाला 60.72 गुणांमूळे तिसरे स्थान मिळाले आहे. काही दिवसांसाठी दिल्लीत आलेल्या प्रियंकाचे फेसबुकवर कमी अपडेट्स पाहायला मिळाले. तर फेसबुकवर 14 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या कॅटरीना कैफचे वोग मैगजिनसाठी केलेले हॉट फोटोशूट आकर्षण ठरले. आणि त्यामूळेच 58.42 गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. 23 मिलीयन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.
स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल ह्यासंदर्भात म्हणतात, “फेसबुकच्या मीमांसेसोबतच आम्ही मीडियामधल्या 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. . यामध्ये ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक एल्गोरिदममूळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते. आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग पर्यंत पोहोचू शकतो.”