गेली १२ वर्षे निरंतरपणे रसिकांचे मनोरंजन करणारे झी टॉकीज, ही प्रेक्षकांची सर्वात लाडकी वाहिनी आहे. विविध दर्जेदार चित्रपटांचे प्रीमियर झी टॉकीज सर्वांसाठी नेहमीच घेऊन येत असते. नानाविध जुने व नवे चित्रपट दाखवत असतांना, सणसमारंभ किंवा इतर खास प्रयोजन असेल अशावेळी एखादी निराळी मेजवानी सुद्धा या वाहिनीवर पाहायला मिळते. सप्टेंबर महिन्याच्या २ तारखेला सुरू होत असलेल्या गणेशोत्सवाचे निमित्त साधून, अशाच काही उत्तम चित्रपटांचा सोहळा झी टॉकीज घेऊन येणार आहे. झी टॉकीजवर हा उत्सव ९ दिवस असणार आहे. या नऊ दिवसांत रोज एक भक्तीपर सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.
२ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता ‘श्री शंभू माझा नवसाचा’ हा चित्रपट पाहायला मिळेल. या चित्रपटाने उत्सवाची सुरुवात होईल. तर ३ तारखेला ‘देऊळ बंद’ हा चित्रपट पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल. मनोरंजन आणि देवभक्तीचं दर्शन यांचा सुंदर मिलाफ असलेले हे चित्रपट पाहायला नक्कीच आवडतील. ‘आदिमाया आदिशक्ती’, ‘उदे गं अंबाबाई’, ‘कुलस्वामिनी’, ‘हळद तुझी, कुंकू माझं’, ‘भाऊ माझा पाठीराखा’ व ‘सत्त्वपरीक्षा’ या चित्रपटांचा झी टॉकीजवरील उत्सवात समावेश असेल. भक्ती आणि मनोरंजन या दोन्हीचा समावेश असलेले हे चित्रपट पाहणे ही प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी असणार आहे.
याशिवाय या भक्तीपूर्ण उत्सवाचा शेवट एका दमदार विनोदी सिनेमाने होणार आहे. भारत जाधव यांची मुख्य भूमिका असलेला, ‘श्रीमंत दामोदरपंत’ हा चित्रपट सुद्धा या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
या उत्सवाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहत राहा, आपले सगळ्यांचे लाडके ‘झी टॉकीज’!!