गाणी म्हणजे सिनेमाचा जीव, कोणताही सिनेमा असो गाणी नाहीत असे क्वचितच सिनेमे असतील ,गाणं सिनेमाच्या कथानकाला प्रेक्षकांच्या हृदयात नेवून बसवंत,गाणं प्रेक्षकांना सिनेमा पाहायला भाग पाडतं,गाणी प्रेक्षकांच्या भावना जिवंत करतात ,आणि गाण्यांमुळे सिनेमा प्रेक्षकांच्या वयक्तिक आयुष्याशी रिलेट होतो .
राजकीय पडद्यावर बहुजनांच्या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका साकारणारे गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर यांचा पहिला मराठी सिनेमा ‘धुमस’ ५ एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.आत्तापर्यंत ‘धूमस’ सिनेमातील ‘मन भरून आलया’,’मन बेजार झालया’ ,’गळतय काळीज घामानं’ ही गाणी प्रदर्शित झाली .सोशीअल मीडियावर ही गाणी धुमाकूळ घालत आहेत .अनेकांना ह्या गाण्यांनी भुरळ पाडली आहे .
गीतकाराने जरी गावरान रांगड्या भाषेतली सिनेमासाठी गीतं लिहिली आहेत,गावरान बाज सांभाळत गाणी वेगळ्याच धाटणीची पण आकर्षक बनवण्यात पी.शंकराम ह्या संगीतकाराला यश आले आहे .युट्युब ,इन्स्टाग्राम, टिकटॉकवर ह्या गाण्यांना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे .हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीची गायिका श्रेया घोषाल आणि गायक सोनू निगम ते मराठीसिनेसृष्टीतला अवधूत गुप्तेपर्यंत दिग्गज गायकांनी ‘धुमस’ सिनेमातल्या गाण्यांना स्वरबद्ध केलं आहे .
‘धुमस’ सिनेमा दाक्षिणात्य प्रकारचा आणि धाटणीचा बनवण्याचा प्रयत्न जसा केला आहे तसेच सिनेमातली गाणीदेखील गावरान बाज सांभाळत दक्षिणात्य प्रकारची करण्याचा प्रयत्न पी.शंकराम यांनी केला आहे .मित्रांनो थोडक्यात आपण जाणून घेऊयात ‘धुमस’ सिनेमातल्या गाण्यांविषयी .
‘मन भरून आलया’ हे गाणं नुकतंच रिलीज करण्यात आल.गाणं ऐकल्यानंतर आपल्या प्रिय व्यक्तीची नक्कीच आठवण येते .गावरान शब्दांना दिलेला दाक्षिणात्य संगीतातल्या ठेकयाने नक्कीच गाणं मनात घर करून जात .ह्या गाण्याला हिंदीसिनेश्रुष्टीतील गायक, गायिका ज्यांनी आत्तापर्यंत मराठी हिंदी ,तामिळ आणि इतर अनेक भाषांमध्ये गाणी गाऊन वेगळाच ठसा उमटवला आहे श्रेया घोषाल आणि सोनू निगम .
ह्याच सिनेमातल दुसरं गाणं ‘बेजार झालया’ हेही गाणं तितकच गोड, रांगड, गावरान पण दक्षिणात्य झालर पांघरलेल .ह्या गाण्याला मराठमोळ्या अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी स्वरबध्द केलं आहे .हेही गाणं दक्षिणात्य वाटत असलं तरी गावरान, मराठमोळा बाज टिकवून ठेवण्यात पी.शंकराम यांना यश आले आहे .
धुमस सिनेमातल तिसरं धमाकेदार ,दमदार गाणं म्हणजे ‘गळतय काळीज घामानं ‘ उडत्या चालीच हे गाणं ठेक्यावर डुलायला भाग पाडत .आपला मराठमोळा सुप्रसिद्ध गायक आपला सर्वांचा लाडका आदर्श शिंदे याने या गाण्याला दमदार आवाज देत गाणं धमाकेदार बनवलं आहे .तसेच कविता राम हिने ह्या गाण्याला स्वरबद्ध करून चार चांद लावले अस म्हंटल तर वावग ठरणार नाही .संगीतकाराने प्रेक्षकांच्या मनाचा अचूक अंदाज घेत हेही गाणं अप्रतिम बनवले आहे .विडिओमध्ये विशाल निकम आणि कृतिका गायकवाड यांचा डान्स पाहण्याजोगा आहे .
‘धुमस’ सिनेमातल चौथ गाण ऐकल्यानंतर खरोखर गोपीचंद पडळकर ,उत्तमराव जानकर आणि त्यांच्या टीमचं कौतुक वाटत ,मराठीत पूर्णपणे एक अनोखा ,दाक्षिणात्य प्रयोग करण्याचा प्रयत्न केला आहे .’शेर आला शेर’ ह्या गाण्याचं संगीत दाक्षिणात्य धाटणीचे आहे .मराठीमध्ये व्याख्यानाजोगे प्रयोग होऊ शकतात हे ह्या ‘शेर आला शेर’ ह्या गाण्याच्या संगीताने सिद्ध करून दाखवले आहे .ह्या गाण्याला दिव्य कुमार ह्या गायकाचा आवाज लाभला आहे .अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पी.शंकराम यांनी ‘धुमस’ सिनेमातील गाण्यांना संगीतबद्ध केले आहे .
‘धुमस’ सिनेमातली ठसकेबाज लावणी देखील तुमच्या भेटीला लवकरच येणार आहे .पी .शंकराम यांचा लावणीतलाही ठसका पाहायला मिळणार आहे .लावणीला सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे .लावणी विडिओ सॉंग अद्याप झी म्युझिक कंपनी ह्या युट्युब चॅनल वर रिलीज केलेले नाहीये .तरीही व्हिडिओमधल्या जीवघेण्या ,दिलखेचक अदाकारी पाहन उत्सुकतेचे ठरेल .
ही संपूर्ण गाणी ऐकताच क्षणी हृदयात बसतात ह्याच श्रेय जितकं गायक गायिका ,संगीतकार यांचं आहे तितकंच अविनाश काळे यांचंदेखील आहे. मित्रांनो अविनाश काळे यांचं नाव मी जाणूनबुजून शेवटी घ्यावं म्हंटल .आत्तापर्यंत ह्या सगळ्या गाण्यांविषयी आपण माहिती जाणून घेतली पण त्या गाण्यांचा बाप ,जन्मदाता गीतकार अविनाश काळे हे आहेत.
साधी ,सोप्पी ,पटकन समजेल उमजेल अशी भावना जिवंत होतील अशी गीतरचना अविनाश काळे यांनी प्रत्येक गाण्याची केली आहे .पाचही गाणी वेगवेगळ्या प्रकारची आहेत तरी तितक्याच ताकदीने प्रत्येक प्रकारच्या गाण्याला शब्द देऊन अविनाश यांनी ‘धुमस’ सिनेमाला आकर्षक ,भूप्रतिक्षित बनवले आहे.
अविनाश यांची पाचही गाण्याची गीतरचना बारकाईने पाहता अविनाश यांचा गीतलेखनातला मजबूत हातखंडा असल्याचं जाणवतो. अविनाश यांचा हा गीतलेखनाचा गावरान तडका ५ एप्रिलला सिनेमागृहात धुमाकूळ घालेल. गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जाणकार यांच्या ह्या पहिल्या सिनेमातील गाण्यांना प्रचंड प्रतिसाद तर मिळत आहे त्याचबरोबर ५ एप्रिलला ‘धुमस’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेलच यात तिळमात्रही शंका नाही.