‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ हा कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्राला हसवित असतो त्यामुळे सर्वपरिचितच आहे ही हास्य जत्रा. यंदा या हास्य जत्रेचे दुसरे पर्व सुरु होते.यात सहा जोड्यांची स्पर्धा सुरु होती. यंदा महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये ‘कॉमेडीचे जहागिरदार’ किताब मिळाला आहे पृथ्वीक प्रताप आणि शितल कुलकर्णी यांना.

महाराष्ट्राला मनभरुन हसवणाऱ्या सोनी मराठी वरील ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ आणि त्यामधील विनोद निखळ आनंद देत सादर करणारे कलाकार यांनी प्रेक्षकांच्या मनात स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपला थकवा विसरुन या कलाकारांच्या विनोदामध्ये प्रेक्षक स्वतःला विसरुन जात आहे. कालच ग्रॅण्ड फिनाले मध्ये पृथ्वीक आणि शितलने बाजी मारली. या जोडीने ‘कॉमेडीचे जहागिरदार’ हा किताब मिळविला आहे.

कॉमेडी रिऍलिटी शो असणाऱ्या ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ मध्ये पृथ्वीकने सगळ्यांची मने जिंकली. कॉमेडीचे जहागिरदार हा किताब मिळाल्यानंतर पृथ्वीक प्रताप सांगतात, हा कार्यक्रम दिसतो तसा सोपा नाही आहे, करताना खूप कठीण आहे. एक दिवस रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी लगेच शुट. प्रत्येक आठवड्याला बेस्ट स्किट निवडले जायचे त्यामध्ये आमच्या जोडीला बारा स्किटमध्ये पाच वेळा बेस्ट परफॉमर्न्स म्हणून निवडले गेले.

सोनी मराठी या नवीन चॅनेलवर सगळ्या नवोदित कलाकारांना मिळालेला मोठा प्लॅटफॉर्म आहे असे पृथ्वीक आवर्जून सांगतो. पृथ्वीक प्रताप हा झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध मालिका ‘जागो मोहन प्यारे’ मधील राहुलची भूमिका साकारणारा एक विनोदी पात्र होता. शाळेतील आयुष्यावर आधारित विनोद गायकर लिखित ‘बॅकबेंचर्स’ वेबसिरीज मध्ये विनोदी-मस्तीखोर पात्र साकारणारा पात्र पृथ्वीक आहे. जो युवावर्गांमध्ये खूपच गाजला. ‘निर्भय-एक व्यासपीठ’ या मासिका तर्फे पृथ्वीक प्रतापला अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीबद्दल कल्याण- डोंबिवली महानगर पालिकेमध्ये महापौरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. जागो मोहन प्यारेच्या निमित्ताने, बॅकबेंचर्स आणि वेकअप या सामाजिक संदेश देणाऱ्या लघुपटाद्वारे पृथ्वीक प्रताप नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस आला आहे.