‘सैराट’ झाला ‘फॅंड्री’तील जब्या… ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर केली मस्ती (व्हिडिओ)
सैराटची टीम आणि थुकरटवाडीतील जब्याची धमाल पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
नागराज मंजूळेच्या ‘सैराट’मधील झिंगाट गाण्याची तरूणाईल चढलेली झींग सध्या काही औरच आहे. नागराजच्या ‘सैराट’ची उत्सुकता वाढवली ती त्याच्या ‘फॅंड्री’ या सिनेमाने. ‘फॅंड्री’तील जब्या हा अनेकांच्या कौतूकाचा आणि लक्षात राहिलेला विषय. सध्या हाच जब्या थुकरटवाडीत येऊन ‘चला हवा येऊ द्या’च्या सेटवर ‘सैराट’ होऊन मस्ती करताना दिसतोय. (सैराटची टीम आणि थुकरटवाडीतील जब्याची धमाल पाहण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा)
येत्या २९ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटील येतोय. मात्र, त्या आगोदर ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात नागराजच्या ‘सैराट’चे प्रमोशन होत आहे. त्यासाठी सैराटची सगळी टीम सेटवर येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमोही प्रसारमाध्यमांमध्ये आले आहेत. प्रसारमाध्यमांत आलेल्या या प्रमोंनी ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमासह ‘सैराट’चीही उत्सुकता वाढवली आहे. उत्सुकतेला कारण ठरली आहे ती, या कार्यक्रमात साकारलेला ‘फॅड्री’तील जब्या
चित्रपट प्रदर्शीत होण्यापूर्वीच त्यातील गाण्यांनी तरूणाईच्या हृदयावर राज केले आहे. अनेक एफएम चॅनल, म्युजीक चॅनल आणि असंख्यांच्या मोबाईल, लॅपटॉप आणि संगणकावर ‘सैराट’मधील गाणी वाजत आहेत. थोडक्यात सांगायचे तर अनेंकांना ‘सैराट’चा विंचू चावला आहे. तर अनेकजन ‘सैराटं’झालं जी म्हणत ‘झिंगाट’बणले आहेत. याच चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी सैराटची टीम पोहोचली थुकरटवाडीमध्ये आणि या मंचावर त्यांनी एकच धम्माल उडवून दिली
Chala Hawa Yeu Dya Mimicry On Sairat 22nd April 2016
[youtube]https://www.youtube.com/watch?v=ovNXfoXvsGY[/youtube]