हा नाताळ आयटीएम च्या विद्यार्थ्यांसाठी काहीसा निराळाच होता कारण यावेळी पंचतारांकित हॉटेल्स च्या हाताची हुबेहूब चव आयटीएमच्या विद्यार्थ्यांमध्ये चाखायला मिळाली . मुंबईतील नामवंत पंचतारांकित हॉटेल्सचे शेफस् निरनिराळे खाद्यपदार्थ कशा प्रकारे बनवले जातात त्याचप्रमाणे ते कश्याप्रकारे सजवले जाते याचे सम्यक ज्ञान आयटीएम च्या विद्यार्थ्यांना दिले . या पंचतारांकित हॉटेल्स मध्ये ताजमहाल , जे डब्लू मॅरियट , ट्रीडन्ट , आयटीसी ग्रँड सेंट्रल सारख्या ख्यातनाम हॉटेल्सचा समावेश होता . आयटीएम च्या विद्यार्थ्यांनी या नामवंत हॉटेलमधील कार्यरत शेफकडून मेजवानी मध्ये येणारे सर्व खाद्यपदार्थ कशा प्रकारे बनवले जातात यापासून ते कश्याप्रकारे ताटात वाढले जातात या बद्दल माहिती दिली .

नाताळच्या या खास प्रसंगी आयटीएमच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन खाद्यपदार्थ  बनवले आणि त्याच पंचतारांकित हॉटेल्सच्या त्यांच्या गुरूंना चाखायला दिली . या उपक्रमामुळे मुलांना प्रोत्साहन देण्यात मला वेगळाच आनंद होत आहे