‘झी युवा वरील अंजली मालिकेचा धम्माल शतकोत्सव!!

‘नवे पर्व युवा सर्व’ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी “झी युवा” ही महाराष्ट्रातील तरुण मुलं मुली आणि त्यांची आवड लक्षात घेऊनच झीनेटवर्क ने लाँच केली होती. झी युवा या वाहिनीला हल्लीच १ वर्ष पूर्ण झाले आहे आणि या वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘अंजली ‘ चे १०० एपिसोड नुकतेच पूर्ण झाले. हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणाऱ्या “अंजली “ या मालिकेच्या प्रेमात अख्खी तरुणाई पडली आहे. या मालिकेतील कलाकार सुरुची अडारकर, पियुष रानडे, हर्षद अतकरी , राजन भिसे , रेशम श्रीवर्धनकर , अभिषेक गावकर , भक्ती देसाई , उमा सरदेशमुख , योगेश सोमण , मीना सोनावणे , उमेश ठाकूर , संकेत देव , अर्चना दाणी या सर्वांनाच प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिलंय .

एखादी मालिका जेव्हा तिचे १०० भाग यशस्वी रित्या पूर्ण करते याचाच अर्थ प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिलेली असते . सुरुची अडारकर म्हणजेच अंजलीक्षीरसागर ही नाशिक  जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी .अतिशय साधी , हुशार आणि  प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशयलाडकी  आहे .  तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत ती म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्याठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत  तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी “मोबाईल रुग्णालय” सुरु करणे . ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरातशिकायला  येते . अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटल मध्ये ती  इंटर्नशिप करायला सुरुवात करते .  तिच्याबरोबर अनुराधाआणि ओंकार हे दोघे सुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. याच हॉस्पिटल मध्ये  जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा  डॉ. यशस्वीखानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती ही रुग्णांच्याकाळजीपेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. आणि अगदी बरोबर उलट डॉ. असिमम्हणजेच पियुष रानडे हा गावोगावी फिरून गरीब रुग्णाची सेवा करत आहे. सध्या अंजली आणि पियुष यांच्या एकमेकांवरील अव्यक्त प्रेमाचा प्लॉट मालिकेत सुरुअसून त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. अंजलीची तत्वे आणि यशस्वी ची स्वप्न यात नेमका कोणाचा विजय होईल हे सांगणारी ही मालिका आहे. हॉस्पिटलच्याभावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कश्या प्रकारे या हॉस्पिटल मध्ये तिची इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा  प्रवासकरते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल . झी युवावर  सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता ही मालिका पहायला मिळेल .

Zee Yuva Anjali Serial 100 Episode Photos