Zee Yuva Prem He Samparpan
तिच्या आणि त्याच्या जगण्याचं एकच कारण …. “समर्पण” झी युवावर प्रेम हे ची नवीन गोष्ट !
Prem He प्रेम हे असेच असते सरल्यावरही उरते उरल्यावरही बहरत राहते. प्रेमात वाद नको असतो तर संवाद हवा असतो , प्रेमात राग नको असतो तर अनुराग हवा असतो , जीव देणे नको असते पण जीवाला जीव लावणे हवे असते. प्रेम ही भावनाच अमर्याद आहे. प्रेमात आखंड बुडणे, एखाद्या व्यक्तीसाठी प्रेमात सर्वस्व त्यागणे हि भावनाच वेगळी आहे . अश्याच काहीश्या विचारांनी बहरलेली “समर्पण “ ही नवीन गोष्ट झी युवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे ..प्रेम हे या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये दिव्येश आणि रमाची अमर कहाणी झी युवावर , येत्या सोमवार ३ एप्रिल आणि मंगळवार ४ एप्रिल रात्री ९ वाजता ,पाहायला मिळेल .
Aroh Welankar आरोह वेलणकर म्हणजेच या गोष्टीतला दिव्येश, हा अतिशय श्रीमंत घरातील मुलगा असून अनेक वर्षे अमेरिकेत राहत होता .आधी अमेरिकेत आणि आता भारतात आल्यावरही त्याची समाजाची नाळ कधीच तुटली नाही . अतिशय सुस्वभावी आणि सुशिक्षत असा दिव्येश हा अतिशय जीव लावणारा मुलगा. तर Ashwini Kasar अश्विनी कासार म्हणजेच या गोष्टीतील रिमा , ही मध्यमवर्गीय घरातील पण जबाबदारीची जाणीव असेलेली मुलगी , वडील गेल्यानंतरही खंबीर पाने घर सांभाळणारी दिव्या अतिशय स्वावलंबी आणि निरागस मुलगी आहे .
दिव्येश चे वडील मिस्टर कारखानीस म्हणजेच यतीन कारेकर . ही गोष्ट तशी जुनी पण तेवढीच नवीन आहे . यात प्रेम आहे , राग आहे , द्वेष आहे , मत्सर आहे सूड आहे , आणि मुख्य म्हणजे समर्पण आहे . गोष्ट सुरु होते रिमाच्या घरावरून , दिव्येशचे वडील म्हणजेच कारखानीस हे मोठे बिल्डर असून त्यांना रिमाचे घर हवे आहे . वाट्टेल ते मार्ग वापरून ते रिमा आणि तिच्या आईला तिथून काढण्याचा प्रयत्न करत असतात. दिव्येश सुद्धा पहिला बिझिनेस पॉईंट च्या दृष्टीने वडलांना मदत करतो . पण हळू हळू निरागस रिमाच्या प्रेमात पडतो . रिमालाही दिव्येश आवडू लागतो.पण … या पण च्या पलीकडे असं बरंच काही आहे जे पाहून प्रेम केलेल्या प्रत्येकाचे मन हळहळेल. हि गोष्ट आहे ओंजळ भरलेल्या पाण्यासारखी, नकळत ओंजळ रिकामी होते , मग उरतो तो फक्त ओलावा प्रत्येक आठवणीचा.