zee-marathi-award-2016




Zee Marathi Award 2016

‘झी मराठी अवॉर्ड’ सोहळ्यात ‘काहे दिया परदेस’ची बाजी

मराठी मनोरंजनविश्वात एकाहून एक सरस कार्यक्रम देऊन रसिक प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या ‘झी मराठी’ Zee Marathi वाहिनीचा लोकप्रिय पुरस्कार सोहळा ‘झी मराठी अवॉर्ड २०१६’ Zee Marathi Award 2016 नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला.

प्रेक्षकांचा कौल घेऊन देण्यात येणाऱ्या या सोहळ्यात यंदा बाजी मारली ती ‘काहे दिया परदेस’ या मालिकेनं… सर्वोत्कृष्ट मालिकेसह, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट नायक, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट वडील, सर्वोत्कृष्ट भावंडं, सर्वोत्कृष्ट सून, सर्वोत्कृष्ट सासरे, सर्वोत्कृष्ट सासू, लक्षवेधी चेहरा असे तब्बल ११ पुरस्कार या मालिकेने पटकावले.

सर्व मालिकेतील प्रमुख नायक नायिकेच्या जोड्यांचे बहारदार नृत्य, चला हवा येऊ द्याच्या मंडळींचे हास्यस्फोट आणि वैभव मांगलेच्या सोबतीने मालिकेतील विविध पात्रांचे खुमासदार निवेदन या सर्व गोष्टीने हा सोहळा उत्तरोत्तर रंगत गेला.

‘दिल मराठी, धडकन मराठी’ असं ब्रीदवाक्य असलेला आणि मराठीच्या विविध रुपांची गोष्ट आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगणारा हा सोहळा येत्या २३ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.

झी मराठी अवॉर्ड २०१६’ विजेते



  •  सर्वोत्कृष्ट मालिका  : काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट कुटुंब  :  काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट नायिका  : गौरी – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट नायक : शिव – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट भावंडं  : गौरी-नचिकेत – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्री  : पार्वती आजी – खुलता कळी खुलेना
  • सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा पुरुष  :  पांडू – रात्रीस खेळ चाले
  • सर्वोत्कृष्ट जोडी : शिव गौरी – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट आई :  राधिका – माझ्या नवऱ्याची बायको
  • सर्वोत्कृष्ट वडील :  मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट सासू : आजी – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट सासरे :  मधुसूदन सावंत – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट सून  :  गौरी – काहे दिया परदेस
  • सर्वोत्कृष्ट खलभूमिका :  शनाया – माझ्या नवऱ्याची बायको
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा स्त्री :  महालक्ष्मी – जय मल्हार
  • सर्वोत्कृ्ष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा पुरुष :  नारद – जय मल्हार
  • सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत : खुलता कळी खुलेना
  • सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा : भाऊ कदम – चला हवा येऊ द्या
  • सर्वोत्कृष्ट सूत्र संचालक  : डॉ. निलेश साबळे
  • सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम :  चला हवा येऊ द्या
    विशेष पुरस्कार
  •  वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत लक्षवेधी चेहरा : गौरी – काहे दिया परदेस
  • कोलगेट मॅक्स फ्रेश फेस ऑफ द इयर : अंजली – तुझ्यात जीव रंगला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here