मित्रांनो!, टीव्ही आणि बॉलिवूडचे वरिष्ठ अभिनेता अनुपम श्याम यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. अनुपम श्याम Actor Anupam Shyam यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते 63 वर्षांचे होते. अनुपम यांच्या निधनामुळे टीव्ही इंडस्ट्री आणि बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.

त्यांच्या जाण्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनुपम यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करायचे बंद multiple organ failure झाल्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे. ते गेल्या काही महिन्यांपासून डायलिसिस करत होते. त्यांच्यावर मुंबईच्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

अनुपम यांना किडनीच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारांवर मोठा खर्च होत होता. गेल्या वर्षभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.अतिदक्षता विभागात गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. उपचारांनंतरही त्यांची प्रकृती खालावत गेली आणि मल्टीपल ऑर्गन फेल्यूअरमुळे त्यांचं निधन झालं. अनुपम श्याम यांनी मालिकांसोबतच अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं.

मात्र ‘प्रतिज्ञा’ या मालिकेमुळे ते घराघरात पोहचले. गेल्या वर्षी अनुपम यांचे भाऊ अनुराग यांनी आर्थिक परिस्थितीमुळे अनुपम यांच्यावर उपचार करणं कठिण जात असल्याची माहिती दिली होती. उपचारा दरम्यान अनुपम यांना अनेक कलाकारांनी आर्थिक मदत देखील केली होती. एवढचं नव्हे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देखील अनुपम यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत केली होती.

अनुपम यांना किडनीच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर उपचारांवर मोठा खर्च होत होता. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनुपम श्याम यांच्या उपचारांसाठी २० लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.यासोबतच अनुपम श्याम यांच्या कुटुंबियांनी सलमान खानच्या बींग ह्यूमन फाउंडेशनकडे देखील मदतीची याचना केली होती. त्याचसोबत त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारणा करण्यासाठी अभिनेता मनोज वायपेयीने देखील त्यांच्याशी संपर्क साधला होता. मनोज वायपेयीसोबतच अनुपम श्याम यांनी ‘सत्या’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं.

अनुपम यांनी ‘लिटिल बुद्धा’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर शेखर कपूर यांच्या ”बॅडिंट क्वीन’ या सिनेमाची त्यांना ऑफर मिळाली. ‘स्लमडॉग मिलेनियर’, ‘द वॉरियर’, ‘थ्रेड’, ‘शक्ति’, ‘हल्ला बोल’, ‘रक्तचरित’ अशा अनेक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं होतं. असं असलं तरी अनुपम यांनी खरी ओळख छोट्या पडद्यामुळे मिळाली. ‘मन की आवाज प्रतिज्ञा’, ‘कृष्णा चली लंदन’ आणि ‘डोली अरमानों की’ या मालिकांमधून त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.