यारी दोस्तीच्या सिनेमात झाली ‘गणू’ ची एण्ट्री
Yaari Dosti (2016) Marathi movie Songs Free Download
मित्र…! केवळ दोन अक्षरांत तयार झालेल्या या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे, गरजेच्यावेळी आपण हक्काने ज्या व्यक्तीकडे मदतीची अपेक्षा करतो, तो पाठीराखा म्हणजेच मित्र! आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येकांचे विघ्न दूर करणारा ‘विघ्नहर्ता’ हा देखील खऱ्या मित्रांच्या यादीत मोडतो. आयुष्याच्या वाटेवर दिशादर्शक ठरणारा हा ‘देव’ मित्र प्रत्येकांच्या अंतर्मनात दडलेला असतो. असा हा ‘देव’ म्हणजेच गणपती बाप्पा उर्फ ‘गणू’ ने नुकतीच ‘यारी दोस्ती’ या आगामी सिनेमात एण्ट्री केली आहे. मैत्रीची परिभाषा मांडणाऱ्या या सिनेमाच्या टीमने ‘गणू’ या नव्या मित्राचे नुकत्याच एका कार्यक्रमात ढोलताशाच्या गजरात स्वागत केले. गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर वरळी येथील प्रशस्त एन.एस.सी.आयमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात ‘यारी दोस्ती’ सिनेमातील सर्व कलाकारांनी उपस्थिती लावली होती.
Yaari Dosti (2016) Marathi movie Songs Free Download
काही दिवसावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाचा माहोल आणि जल्लोष या कार्यक्रमात पाहायला मिळाला. आराध्याच्या खिदमतीस लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तजवीज या समारंभात करण्यात आली होती. फुलांची आरास, अत्तरांचा सुगंध आणि रांगोळी अशा प्रसन्न वातावरणात ‘गणू’ चे स्वागत करण्यात आले.
Yaari Dosti (2016) Marathi movie Songs Free Download
सोबतीला आदर्श शिंदे यांच्या शाही आवाजातले ‘बाप्पा बाप्पा…’ या गाण्याने कार्यक्रमात आणखीनच रंग भरला. सिनेमातील गटर, नाला, लाडू आणि वन प्लस वन या मित्रांनी त्यांच्या पाचव्या मित्राचे भन्नाटरित्या स्वागत केले. या चौघांनी मिळून चिकन मातीची गणेश मूर्ती बनवत ‘गणू’ ला लोकांसमोर आणले.
Yaari Dosti (2016) Marathi movie Songs Free Download