२०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘टकाटक’ या चित्रपटाने बॉक्सऑफिस गाजवलं. प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करून अनेक पुरस्कार देखील पटकावले. भन्नाट पोस्टर आणि अफलातून ट्रेलर यामुळे या चित्रपटाची सुरुवातीपासूनच चर्चा होती. या चित्रपटातील एका गाण्याची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजित आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर चित्रित करण्यात आलेलं ‘ये चंद्राला’ हे रोमँटिक सॉंग पाहायला मिळाले होते. या गाण्यातील प्रणालीचा हॉट अंदाज आणि तिच्या मादक अदा यांनी प्रेक्षकांना घायाळ केलं. श्रुती राणे हिने गायलेल्या या गाण्याला युट्युबवर १ करोडच्या वर व्ह्यूज मिळाले आहेत.

मिलिंद कवडे दिग्दर्शित या चित्रपटात सेक्स कॉमेडी हा प्रकार हाताळण्यात आला आहे. मराठीमध्ये अशा प्रकारच्या चित्रपटांची संख्या फारच कमी आहे. त्यामुळे प्रेक्षकांची मनं जिंकत या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. पुन्हा एकदा या भन्नाट चित्रपटाकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी झी टॉकीज हि वाहिनी प्रेक्षकांसाठी २६ जुलै रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ‘टकाटक’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर करणार आहे. त्यामुळे आपला रविवार ‘टकाटक’ बनवण्यासाठी पाहायला विसरू नका झी टॉकीज.