लिवा प्रोतेज 2017मध्ये दिल्लीची बाजी; ईशा गुप्ता केले कौतुक
अभिषेक तिब्रेवालचे डिझाईन्स ठरले सर्वोत्तम
लिवा प्रोतेज 2017 गुरूवारी बांद्रा इथल्या ताज हॉटेलमध्ये पार पडला. लिवा प्रोतेजने मुंबईसह इतर शहरांतील फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठा प्लॅटफॉर्म दिला आहे. यावेळी मिस इंडिया इंटरनॅशनल व अभिनेत्री 2007 ईशा गुप्ता शो टॉपर म्हणून उपस्थित होती. देशभरातून सर्वच विद्यार्थ्यांनी या पर्धेत सहभाग घेतला होता. या फॅशन शोचे वैशिष्ट्य होते ते म्हणजे या स्पर्धेत विजयी ठरणाऱ्या विद्यार्थ्याला ऍमेझॉन फॅशनवर स्वत:च्या नावाचे डिझाईन केलेले कपडे विकता येणार आहेत. पहिला क्रमांक दिल्लाच्या पर्ल इन्स्टिट्युटमधील अभिषेक तिब्रेवालने पटकावला, दुसरा क्रमांक हैद्राबादच्या सोनिका पुल्लुरू हिने तर तिसरा क्रमांक कोलकातामधील दिब्यानी मिश्रा हिने पटकावला. आदित्य बिर्ला ग्रुपच्या लिवा या डिझायनर डिव्हिजनमधील नैसर्गिक कपडांचा वापर या फॅशन शोसाठी करण्यात आला होता. लिवा क्रेम हे सध्या बाजारात रिसायकल कपड्यांसाठी प्रसिद्ध आहे. तेव्हा देशभरातल्या विविध फॅशन इन्स्टिट्युटमधील विद्यार्थ्यांना आपले डिझाईन्स सादर करताना एक आवाहन समोर होते. या फॅशन शोसाठी इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गजही ज्युरी म्हणून उपस्थित होते. तसेच फॅशन आयकॉन परवीन बेदी व ऍमेझॉन फॅशनचे क्रिएटिव्ह हेड नरेंद्रकुमार अहमद हेही उपस्थित होते. स्वत: डिझाईन केलेले कपडे मॉडेल्सनी परिधान करून रॅम्पवॉक केल्याने सहभागी विद्यार्थ्यांना एक मोठा प्लॅटफॉर्म यामार्फत मिळाला. यावेळी ईशाच्या रॅम्पवॉकने सर्वांचे लक्ष वेधले.