आयपीएल सध्या शेवटच्या टप्प्यात पोहचलेलं आहे. प्ले ऑफ मध्ये स्थान पक्के करण्यासाठी सर्वांचीच कसून तयारी सुरू आहे. चेन्नई आणि इतर काही संघाचे प्ले ऑफ स्वप्न भंगलेलं आहे. तर मुंबई, बँगलोर सारखे संघ सध्या चांगल्या खेळाने आघाडीवर आहे.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सध्या चांगल्याच फॉर्मात आहे. आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी RCB ला फक्त एका विजयाची गरज आहे. बुधवारी मुंबईविरुद्ध सामन्यात RCB ने हा विजय मिळवला तर प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान पक्क करणारा तो पहिला संघ ठरेल.
अश्यात रॉयल चॅलेंजर बँगलोर खेळाने आणि कर्णधार विराट कोहलीच्या सामान्यादरम्यानच्या वागण्याबाबत खूप चर्चेत आहे. आपण विराट ला याआधीच्या अनेक मॅच मध्ये छोटी मोठी प्रत्युत्तरे दिल्याचं पाहिलं असेल.
त्यात बायको अनुष्का जर मॅच पाहायला आली तर विराट खूप चांगला खेळ करतो असं निदर्शनास येत आहे. जेव्हा अनुष्का येते तेव्हा चांगली खेळी करून तो फ्लाईंग किस वगैरे देत असतो. हे आपण आयपीएल आणि त्याच्या व्यतिरिक्त मॅचेस मध्ये पाहिलंच आहे.
पण सध्या अनुष्का काही महिन्यांत आई होणार आहे. विराट लहान बाळाचा बाप होणार आहे. दोघेही सध्या दुबईत आहेत. विराट आयपीएल खेळतोय तर अनुष्का त्याला सपोर्ट करत आहे. अश्यातच ती काळजी ही घेत आहे.
विराट ही तिला फार जपत आहे. अनुष्का लवकरच आई बनणार असल्यामुळे विराट एका चांगल्या नवऱ्याची भूमिका निभावत बायकोची काळजी घेताना दिसत आहे.
सध्या सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात विराट भर मैदानावर उभा असताना, स्टँडमध्ये बसलेल्या अनुष्काला खुणावून विचारतो, की तू जेवलीस का ?? त्यावर अनुष्का ही उत्तरते.
एक चांगला नवरा आणि होणाऱ्या बाळाचा सशक्त बाप होण्याची हे सकारात्मक लक्षणे आहेत, जे कोहली आनंदाने दाखवत आहे.
विराट आणि अनुष्काला भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा !…