Vikram Gokhale

हिंदी व मराठी चित्रपटांमधील सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले आज आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. चित्रपटसृष्टीत विक्रम गोखले यांचे नाव आज दिग्गज कलाकारांमध्ये घेतलं जातं.

त्यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1940 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे झाला. विक्रमचे गोखले यांचे कुटुंब फिल्मी क्षेत्राशी निगडीतच होतं.

हिंदी चित्रपटसृष्टीतील त्यांची आजी ही पहिली भारतीय कलाकार होती. आजी ने पहिल्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून भूमिका साकारली होती. 1913 मध्ये त्यांच्या आज्जीने ‘मोहिनी भस्मासुर’ या चित्रपटात काम केलं होतं.

चित्रपटाचे दिग्दर्शन फादर ऑफ इंडियन सिनेमाचे दादासाहेब फाळके यांनी केलं होतं. वडील चंद्रकांत गोखले हे सुद्धा ज्येष्ठ नाट्य कलाकार होते.

गोखले हे अभिनेत्यासोबत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत..

विक्रम गोखले यांच्या बद्दल एक खास गोष्ट म्हणजे ते एक अभिनेता तसेच परोपकारी समाजसेवक ही आहेत. त्यांनी 23 वर्षांपूर्वी एक संघटना स्थापन केली, ज्यात ते अपंग, सैनिक मुले आणि गरजू लोकांना वस्तू पुरवतात.

विक्रम गोखले या अभिनेत्याच्या चित्रपटाच्या जीवनाविषयी बोलायचं झालं तर त्यांचे मुख्य चित्रपट स्वर्ग-नरक, इंसाफ, अग्निपथ, खुदा गवाह,अधर्म, तड़ीपार, आंदोलन, हम दिल दे चुके सनम, भूल भुलैया,दे दना दन, बैंग-बैंग, अय्यारी, हिचकी आणि इतर अनेक सिनेमे आहेत.

काही मालिकेतही केलेलं आहे काम..

विक्रम गोखलेंनी चित्रपटांसोबतच टीव्ही मालिकांमध्येही काम केलेलं आहे. इंद्रधनुष, उड़ान, क्षितिज ये नहीं, संजीवनी, जीवन साथी, सिंहासन, मेरा नाम करेगी रोशन याशिवाय त्यांनी वेब सिरीजमध्येही काम केलेलं आहे.

अनेक पुरस्काराने सन्मानित..

नाटकात अभिनय दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना संगीत अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे.

२०१३ मध्ये त्यांना एका मराठी चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. २०१६ मध्ये त्याच वेळी, घश्याच्या आजारामुळे त्यांनी नाटकाचे प्रयोग करणं बंद केलं.

संघर्ष..

सध्या विक्रम गोखले उच्च न्यायालयात जमीन विकासाशी संबंधित 25 वर्षांच्या जुन्या वादात अडकलेले आहेत. कोर्टाने अभिनेत्याला त्यांच्या अटकेपासून दिलासा दिला.