ventilator-rajesh-mapuskar-sukanya-mone-sulbha-arya-dr




Marathi Movie : Ventilator 2016 |

कुटुंबात ज्याप्रमाणे प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी असतात त्याचप्रमाणे रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे ही आपसुकच येतात. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे.

आज कुटुंबं विभक्त झाली असली तरी त्यांच्यातलं प्रेम संपलय असंही नसतं आणि अनेकदा एकत्र आले म्हणजे तिथे केवळ प्रेमच असतं असंही नसतं. शेवटी कुटुंब हे माणसांनीच बनतं आणि माणसाच्या स्वभावातले गुण त्यातही उतरणं स्वाभाविक असतंच.

अशाच एका कुटुंबाची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘व्हेंटिलेटर’  Ventilator या चित्रपटामधून.

 

एका घटनेमुळे एका जागी आलेलं कामेरकर कुटुंब आणि त्यातील सदस्यातून उलगडत जाणारे नात्यांचे विविध पदर हे अतिशय खुमासदार पद्धतीने सांगणारी गोष्ट या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी एकत्र आली आहेत. आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण करणारी आजची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्रा ‘व्हेंटिलेटर’  Ventilator Marathi Movie मधून मराठी चित्रपटाच्या निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे हे विशेष. तर अनेक हिंदीचित्रपटांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले आणि ‘फेरारी की सवारी’ सारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत.

हिंदीमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर ‘व्हेंटिलेटर’ मध्ये मुख्य भुमिकेत दिसणार आहेत



Ventilator (2016) Marathi Movie Mp3 Songs Free Download

मुंबईतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये पार पडलेल्या शानदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित करण्यात आला. यावेळी दिग्दर्शक राजेश मापुसकर, निर्माती डॉ. मधू चोप्रा ,अभिनेते आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, अभिनेत्री सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, सुकन्या मोने तसेच झी स्टुडिओजचे बिझनेस हेड निखिल साने आदी मान्यवर उपस्थित होते.

 

या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले की,” दिग्दर्शनात व्यस्त असताना पुन्हा कधी अभिनयाकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं.

परंतु यातील राजा कामेरकर या व्यक्तिरेखेसाठी मीच कसा योग्य आहे याबद्दलची खात्री राजेश मापुसकर बाळगुन होते. यासाठी त्यांनी खुप आग्रह केला आणि प्रियांकानेसुद्धा निर्माती म्हणून विश्वास दाखवला आणि मी ही भूमिका स्वीकारली.  मला या चित्रपटाची गोष्ट खुप आवडली.

आता ट्रेलर पाहून तुम्ही जसे हसलात तसा मी देखील फिल्मची संहिता वाचताना हसत होतो! या फिल्मच्या निमित्ताने मला उषा नाडकर्णी, सुलभा आर्या आणि सतीश आळेकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आलं ही माझ्याकरता विशेष आनंदाची बाब होती.”

 

Ventilator Marathi Movie

ashutosh-gowariker-at-the-trailer-marathi-film-ventilator




director-rajesh-mapuskar-at-the-trailer-launch-event-of-marathi-movie-ventilator

dr-madhu-chopra-at-the-trailer-launch-event-of-marathi-movie-ventilator

 

jitendra-joshi-marathi-movie-ventilator

jitendra-joshi-rajesh-mapuskar-and-ashutosh-gowariker-ventilator-marathi-movie

 

ventilator-rajesh-mapuskar-sukanya-mone-sulbha-arya-dr

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here