आजकाल ध्यानीमनी नसतांना अनेकदा अचानकच कुणालाही ब्ल’ड प्रेशर लो होण्याचा त्रा’स होऊ शकतो. ऑफिस मधील कामाचा शारीरिक व मानसिक ताणतणाव, घरी एकटे असल्यास मेंदूत फिरणारे विचारचक्र, सततचा प्रवास, जी’वघेणी धावपळ यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊन बीपी लो होण्याची समस्या उद्भवू शकते.

कुठेही अगदी अचानक बी पी लो झाल्यास, ताबडतोब या पदार्थांचे सेवन केल्यास आपल्या शरीराला होणाऱ्या हानी’पासून नक्कीच वाचवू शकतो.

आपण दैनंदिन जीवन जगत असताना सगळ्यांनाच कोणत्या ना कोणत्या आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागतो. आजकाल वाढते वजन आणि र’क्तदाब इ. संबंधी त्रास कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना होण्याचा धो’का असतो.

ज्याप्रमाणे हाय ब्ल’ड प्रेशर हे आरोग्यासाठी घातक ठरतं त्याचप्रमाणे अचानक र’क्तदाब कमी झाल्यानेही शरीराचे न भरून येणारे नुकसान होऊ शकते. अनेकदा अचानक प्रवासात, कार्यालयात, कामाचे बर्डन असल्यास, किंवा अगदी घरी एकटं निवांत असताना देखील बी’पी लो होऊ शकतो.

आपला दिनक्रम, शरीराची हालचाल, औ’षधोपचार, डाएट यासारख्या बऱ्याच गोष्टींवर आपले ब्ल’ड प्रेशर अवलंबून असते. तर जाणून घ्या ते पदार्थ जे ऐनवेळेस तुमचा जीव वाचवू शकतील.

मीठ-साखर-पाणी : अचानक लो बी पी चा त्रा’स झाल्यास उपलब्ध असल्यास इ’ले’क्ट्रॉ’ड पावडर पाण्यात मिसळून घ्या. ती नसल्यास, लिंबू सरबत अथवा घरातील मीठ, साखर आणि पाणी एकत्र करून त्वरित प्या. त्यामुळे तुमचे ब्ल’ड प्रेशर नियंत्रित होण्यास मदत होईल. ज्यांना कायमच हा त्रास होतो त्यांनी कुठे बाहेर जाताना नेहमी पाणी आणि साखर सोबत ठेवा.

कॉफी: बी पी लो झाल्यास कॉफी प्यावी. कॉफीमुळे र’क्तदाब नियंत्रात राहतो. फक्त अवेळी आणि जास्त प्रमाणात घेणे टा’ळा.

गोड पदार्थ: अचानक र’क्तदाब कमी झाल्यानंतर पटकन एखादा गोड पदार्थ, जसं चॉकलेट, गोळी, किंवा खडीसाखर खाल्ल्यास र’क्तदाब नियंत्रणात आणण्यात फारच उपयुक्त ठरते.

जेष्ठमध : लो ब्ल’ड प्रेशर च्या समस्येवर ज्येष्ठमध परिणामकारक ठरतं. ज्येष्ठमधामुळे र’क्तवाहिन्या, हृदयाचं कार्य सुरळीत राहतं. त्यामुळे ज्येष्ठमधाचा काढा घेतल्यास ब्ल’ड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

तुळस : तुळशीत अनेक औषधी गुणधर्म असतात. लो ब्ल’ड प्रेशरवर तुळस उपयुक्त ठरते. तुळशीची दहा-पंधरा पानं खाल्ल्यास ब्ल’ड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते.

नियमित व्यायाम : योगा आणि व्यायाम रोज केल्याने लो ब्ल’ड प्रेशर ची समस्या उद्भवत नाही. किंवा त्याची तीव्रता कमी होते. यासाठी अर्धा तास रोज व्यायाम करणं गरजेचं आहे.

याशिवाय सकाळी गरम पाणी प्यायल्याने रक्तसंचार व रक्तसंचलन सुधारुन रक्तदाब नॉर्मल ठेवण्यासाठीही मदत होते.

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ उपयुक्त माहिती म्हणून सांगत आहोत. आपण कृपया आपली व्यक्तिगत शारीरिक क्षमता लक्षात घेऊन कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे इष्ट.