ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मित्रांनो! नुकत्याच झालेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स इलेव्हन या IPL सामन्यांत खेळापेक्षा CSK चा गोलंदाज दीपक चहरच्या (Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली. आयोजकांनी VIP पाहुणी म्हणून ज्या मुलीची ओळख करून दिली ती चक्क निघाली दीपक चहरची गर्लफ्रेंड.

चेन्नई सुपर किंग्स ( CSK) आणि पंजाब किंग्स (PBSK) यांच्यातल्या सामन्यात पंजाबनं ६ विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला. लोकेश राहुलनं नाबाद ९८ धावांची खेळी करताना चेन्नईच्या गोलंदाजांची धुलाई केली. पण, त्याच्या या खेळीपेक्षा दीपक चहरच्या (Deepak Chahar) प्रेमाच्या डावाचीच जास्त चर्चा रंगली.

सामन्यानंतर चेन्नईच्या गोलदाजानं स्टँडमध्ये गुडघ्यावर बसून एका मुलीला प्रपोज केलं. याच मुलीला आयपीएल आयोजकांनी VIP गेस्ट असल्याचे त्यांच्या वेबसाईटवर सांगितले होते आणि सामन्यानंतर ती चहरची गर्लफ्रेंड असल्याचे स्पष्ट झाले. सामना संपल्यानंतर दीपक स्टँडमध्ये उभ्या असलेल्या त्या मुलीजवळ गेला. महेंद्रसिंग धोनीची मुलगी जिवाही तेथे उपस्थित होती.

त्या मुलीला काही समजायच्या आधी दीपक तिच्यासमोर जाऊन गुडघ्यावर बसला. त्यानंतर खिशातून अंगठी काढून तिला लग्नाची मागणी घातली. हे सर्व पाहून ती मुलगी आनंदी झाली आणि लगेच होकार दिला. दीपकनं मग दुसरी अंगठी काढून तिला त्याच्या बोटात घालायला सांगितली. आणि त्यानंतर मग अरेच्चा! कोण आहे ही मुलगी? हा प्रश्नं सगळ्यांनाच पडला. गोलंदाज दीपक चाहर (Deepak Chahar) याच्यासाठी मात्र आजचा दिवस खास ठरला.

त्याने प्रेमाच्या मैदानात बाजी मारली. सामना होताच त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. तिनेही त्याचं प्रपोज स्वीकारत त्याला मिठी मारली. दरम्यान यानंतर सर्वत्र सामन्यापेक्षा दीपकच्याच प्रपोजची चर्चा रंगली.

असो! तर मित्रांनो! दीपकच्या गर्लफ्रेंडचं नाव जया भारद्वाज असं आहे. जया चा भाऊ सिद्धार्थ भारद्वाज हा बिग बॉस सीजन 5 मध्ये दिसला होता. दरम्यान दीपक आणि तिच्या अफेयरची बरीच चर्चा होती. पण आज त्यावर मोहोर लागली. जया आयपीएल 2021 मध्ये दीपकसोबतच असून ती सीएसकेच्या बायो बबलमध्ये त्याच्यासोबत होती.

दीपकचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी युएईला गेलेल्या जयाला आज एक वेगळंच सरप्राईज मिळालं ज्याचा तिने विचारही केला नसेल. जया ही दिल्लीची राहणारी असून ती सध्या एका कॉर्परेट फर्ममध्ये काम करते. मैदानात दीपकने जयाला प्रपोज करत अंगठी घालताच ती फार चकीत आणि आनंदी दिसत होती.