कलर्स मराठीवर गाण्याची मैफल पुन्हा सजणार, सुरांशी पुन्हा मैत्री होणार, वाद्य आणि सूरांची पुन्हा गट्टी जमणार कारण आपला आवडता कार्यक्रम ‘सूर नवा ध्यास नवा’ लवकरच सुरू होणार आहे… कार्यक्रमाच्या प्रत्येक पर्वामध्ये गायकांनी विविध शैलींमधील सादर केलेली गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात. या कार्यक्रमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आणि म्हणूनच सूर नवा ध्यास नवाच्या दोन पर्वांच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी पुन्हा घेऊन येत आहे ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाचे तिसरे पर्व. या पर्वाचे विशेष म्हणजे स्पर्धकांना वयाची अट नसेल. ५ ते ५५ हा वयोगट असणार आहे म्हणेजच बच्चेकपंनी पासून सगळ्या वयोगटातील प्रेक्षक या कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतील. यावर्षी देखील उत्तमातून उत्तम सूर शोधण्याचा ध्यास असणार आहे. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन एक नवा सूर शोधण्याचा प्रवास २१ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर सुरांशी दोस्ती आणि रियाझ करायला सुरुवात करा कारण तुमचे सुरेल गाणं ऐकायला सगळेच आतुर आहेत… या पर्वाचा शुभारंभ सप्टेंबरमध्ये होणार आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातील आपल्या सगळ्यांचा लाडका स्पर्धक पुष्कर जोग प्रत्येक शहरात सुरवीरांना प्रोत्साहन तर सुप्रसिध्द संगीत संयोजक मिथिलेश पाटणकर आणि संगीत दिग्दर्शक मिलिंद जोशी प्रत्येक शहरातुन सुरवीरांचा शोध घेतील.

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या पुण्यामधील ऑडिशन्स २४ ऑगस्ट रोजी पार पडणार आहेत. स्थळ – डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, १४/अ, लाल बहादूर शास्त्री रोड, सदाशिव पेठ, पुणे – ४११०३०. वेळ – सकाळी ९ ते संध्या. ४ या शहरांमधून जे स्पर्धक निवडले जातील त्यांना अंतिम फेरीसाठी मुंबईमध्ये यावे लागेल