हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकार त्यांच्या भवितव्यातील पैशांच्या व्यवस्थापनाबाबत फार तल्लख असतात. आणि भविष्याचा आपल्या कुटुंबाचा मुला बाळांचा वगैरे विचार करून ते फार योग्य निर्णय घेऊन सिनेमांव्यतिरिक्त इतर क्षेत्रात पैशाची गुंतवणूक करून पैसा कमावताना आपल्याला पहायला मिळतात.
खरतरं यांशिवाय अनेकजण सिनेमासृष्टीतून वेगळ्या माध्यमातून पैसा कमावताना पहायला मिळतात. आणि ते माध्यम म्हणजे इतर सिनेमा, वेबसिरीज अथवा टिव्ही मालिका यांवर पैसा लावून त्यातून कमाई करणे. अर्थात निर्मात्यांच काम ते करतात. अनेक कलाकारांचे आज कोट्यावधींचे प्रोडक्शन हाऊसेस असलेले पहायला मिळतात. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार ज्यांनी प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून चांगली कमाई आजवर केली आहे.
सर्वात आधी बोलायचं म्हटलं तर बॉलीवुडच्या किंग खानचं अर्थात शाहरूखचं प्रोडक्शन हाऊस. “रे’ड’चि’ली’ज” या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती त्याने आपली पत्नी गौरीला सोबत घेऊन केली. आज याच रेडचिलीजच्या अंतर्गत अनेक प्रोजेक्ट्सची निर्मिती केली जाते. शिवाय रे’ड’चि’ली’जच्या माध्यमातून अनेक नव्या बॉलीवुडबाहेरील चेहऱ्यांना चांगला वाव दिला जातो आहे. रे’ड’चि’ली’ज सिनेमांशिवाय वेबसिरीजची देखील निर्मिती करत आहे. यात बे’ता’ल, बा’र्ड ऑ’फ ब्ल’ड यांसारख्या वेबसिरीजचा समावेश आहे.
यानंतर आपल्या सर्वांचा लाडका आणि गेल्या काही वर्षांपासून कमाईच्या बाबतीत आघाडीवर राहिलेला अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारने आपली पत्नी ट्विंकल हिला सोबत घेऊन “हरी ओम इंटरटेनमेंट” या प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केली आहे. याअंतर्गत सध्या तो आणखी दोन प्रोडक्शन हाऊस चालवताना पहायला मिळतो आहे. त्याच्या प्रोडक्शन अंतर्गत आजवर ओ माय गॉ’ड, रू’स्त’म, खि’ला’डी 786 यांसारख्या सिनेमांची निर्मिती झाली आहे.
पुढे नंबर लागतो तो म्हणजे बॉलीवुडमधून हॉलीवुडमधे नाव कमावलेली अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा. “पर्पल पे’ब’ल” हे तिच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव. तिने सध्यातरी आपल्या या कामाची धुरा आईकडे सोपवलेली पहायला मिळते आहे. शिवाय प्रियंकाने हे प्रोडक्शन हाऊस नव्या व डि’झ’र्विं’ग टॅ’लें’ट’ला वर आणण्याच्या हेतूने उभारलं आहे. तिने या अंतर्गत बहुचर्चित आणि अवॉर्ड मिळवलेला मराठी सिनेमा व्हें’टी’ले’ट’र हा प्रदर्शित केला होता. याशिवाय या प्रोडक्शन अंतर्गत जाहिरातीदेखील बनवल्या जातात.
आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे दंगल हा सिनेमा चक्क स्वत: आमिर खान याच्या प्रोडक्शन हाऊसमधे तयार झाला होता. आमिर खानने आधीच त्याच्याच नावाने प्रोडक्शन हाऊसची निर्मिती केलेली आहे. लगान, ता’रे ज’मी’न प’र, से’क्रे’ट सुपरस्टार, दं’ग’ल यांसारख्या सिनेमांची त्याने निर्मिती केलेली पहायला मिळते. तो सहसा भारतीय पालक, शिक्षणव्यवस्था व विद्यार्थी या गोष्टींना अधिक प्राधान्य देणाऱ्या भुमिका निभावत असल्याचं पहायला मिळतं.
अनुष्का शर्माबद्दल सांगायचं म्हणजे अर्थातचं तिने बॉ’म्बे वे’ल्हे’ट या सिनेमाला पैसा लावून तो ग’मा’व’ल्या’नं’त’रही प्रोडक्शन हाऊस उभारण्याचं धा’ड’स केलं हे विशेष म्हणावं लागेल. आणि तिच्या या धा’ड’सा’चं तिला फळही मिळालं आहे. तिच्या प्रोडक्शन हाऊसमधून बु’ल’बु’ल, पा’ता’ल’लो’क यांसारख्या दर्जेदार वेबसिरीजची निर्मिती झाली आहे. अनुष्का या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करू पाहणार आहे. परी हा सिनेमादेखील तिने याअंतर्गत बनवला आहे.
जॉन अब्राहम हा अभिनेता सतत त्याच्या फिटनेस, कधी विनोदी आणि सहसा डॅ’शिं’क ए’क्श’न भुमिकांना धरून सिनेमातून आपल्याला पहायला मिळतो. तर याच जॉनने काळाची गरज ओळखून आपलं स्वत:च प्रोडक्शन हाऊसदेखील चालू केलेलं आहे. जॉनने त्याच्याच नावावर सुरू केलेल्या या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत आजवर म’द्रा’स कॅ’फे, रॉकी हँ’न्ड’स’म यांसारख्या दर्जेदार सिनेमांची निर्मिती केलेली पहायला मिळते. सध्या जॉनच्या सत्यमेव जयते या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची आतुरता प्रेक्षकांना प्रचंड लागली आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!