बॉलिवुडमधील सिनेकलाकारांच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत असतात. बऱ्याचदा काहींच्या चर्चेत येतात काहींच्या नाही, काहींच्या कामाप्रती असलेल्या डेडिकशनबद्दल असतात तर काहींच्या इतर विषयाबाबत असतात. सध्याच्या घडीला ही बाब चर्चेत येण्याचं कारण म्हटलं तर सलमान खान याच्या नव्या सिनेमातील गाण्याचा “बीटीएस” व्हिडिओ रिलीज झाला आणि कलाकार त्यांच्या कामाबद्दल किती मेहनतीने काम करतात याची पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली. तर हा मुद्दा झाला असा की, अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिचा गाण्याच्या शुटदरम्यान पाय अगदी सुजला होता. तिला पायाला गुडघ्यातही त्रास जावणत होता आणि शिवाय तिच्या पाठीतही चांगलीच कणक आल्याने त्रास जाणवत होता, इतका सगळा त्रास एकदाच होत असताना नृत्य करणं ही गोष्ट काही सोपी नव्हती. परंतु तरीदेखील तिने आपलं डेडिकशन दाखवत या गाण्याच शुट पुर्णत्वाला नेलं. विशेष बात म्हणजे जॅकलिन तिच्या प्रोफेशनल कामाबाबत प्रचंड सतर्क असते कधी अचानक तब्येतीला घेऊन अडचण जर आली तरी ती आधी काम करून नंतर स्वत:कडे लक्ष देते, आणि हे असं करण्याची तिची पहिली वेळ नाहिये. याशिवाय काही इतरही असे कलाकार आहेत ज्यांनी अडचणीचा सामना करत असतानाही शुट पुर्णत्वाला नेलं आहे. चला तर मग अशाच काही इतर कलाकारांबद्दलही जाणून घेऊयात.
पुढील कलाकार म्हटलं तर तो आहे, बॉलीवुडमधील हँडसम आणि तरूणाईच्या गळ्यातला ताईत असलेला अभिनेता वरूण धवन. वरून धवन त्याच्या डान्सचे कौशल्ये आणि फिटनेसमुळे अधिक प्रमाणात चर्चेत राहत असतो. त्याच्या अनेक चाहत्यांना त्याच्या सिनेमाऐवजी त्याच्या एखाद्या गाण्याच्या व्हिडिओची जास्त प्रतिक्षा लागून राहिलेली असते. अर्थातच त्याचे डान्सिंग स्किल्स चांगले आहेत म्हणून प्रभू देवाच्या डान्सच्या सिनेमातही तो चमकला आहे. “स्ट्रिट डान्सर 3 डी” हा डान्सच्या पार्श्वभूमीवर आधारित तिसरा भाग असलेला सिनेमा गेल्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याच सिनेमातील एका गाण्याच्या दरम्यान वरूनचा पाय मुडपला होता आणि तरीदेखील पायाला तात्पुरता स्प्रे मारत, दुखणं विसरत वरूणने गाणं पुर्ण केलं होतं.
यानंतर येणारी कलाकार आहे ती म्हणजे, श्रद्धा कपूर. आज श्रद्धा तिच्या स्वत:च्या एका वेगळ्या लहजेतील भुमिकांसाठी चांगलीच नावाजल्या गेली आहे. तिच्या भारतातल्या चाहत्यांची तर अगदी रांगच लागलेली आहे. श्रद्धा कपूरला तरूणाई वर्गाची विशेष पसंती लाभलेली दरवेळी पहायला मिळतेच. श्रद्धा तिच्या सोज्वळ आणि सोबतच बोल्ड अभिनयातून अनेकांची मने घायाळ करून टाकते. श्रद्धाला क्युट तर समजल्या जातचं, परंतु हिच श्रद्धा तिच्या कामाप्रती किती डेडीकेटेड आहे हे समजल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. बागी सिनेमाच्या वेळी तिचा पाय चक्क फ्रॅक्चर झाला होता. सर्वांना तिचा हा सिनेमा अभिनयापेक्षा तिच्या डान्समुळेच अधिक लक्षात राहतो, तर डान्सच्याच वेळी तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं होतं, तरीदेखील तिने स्वतःची जखम बाजूला ठेवत गाणं पूर्ण करत सर्वांना दाखवून दिलं होतं की, श्रद्धा किती मजबूत स्वभावाची आहे.
यानंतर येणारा कलाकार म्हटलं तर तो आहे कार्तिक आर्यन. कार्तिक आर्यनने गेल्या काही काळापासून आपली स्वत:ची एक वेगळी छबी सिनेसृष्टीत पाडल्याची पहायला मिळते आहे. त्याचे अनेक चांगले सिनेमे आजवर रसिकप्रेक्षकांसमोर आले. त्याच्या अभिनयातून त्याने हल्लीच्या तरूणाईच्या अगदी काळजालाच जणू हात घातला, कार्तिक आर्यनची चर्चा सोशल मीडियावर वारंवार रंगत असते. लुका छुपी हा क्रिती सेनन सोबत आलेला कार्तिकचा सिनेमा चांगला प्रसिद्ध झाला. या सिनेमातील गाण्यांनाही रसिकप्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याचदरम्यान कार्तिकच्या पायाला एक जखम झाली होती आणि त्याने ती जखम आधी इतरांपासून लपवत, आपलं शुट पुर्ण करून टाकलं होतं. कार्तिकही त्याच्या कामाप्रती वारंवार चांगलच डेडिकशन दाखवतो हे आपण नेहमीच त्याच्या अभिनयातूनदेखील पाहिलं आहे.
यापुढे येणारी कलाकार अभिनेत्री म्हटलं तर ती आहे सोनम कपूर. अनिल कपूरची मुलगी असलेल्या सोनमला आज जरी हवं तसं यश हिंदी सिनेसृष्टीत मिळवता आलं नसलं तरी तिला ज्या भुमिका मिळाल्या तिने त्यांना पुर्णत: चांगल्याच जोमाने स्क्रीनवर उतरवलं आहे. या अभिनेत्रीच्या प्रेम रतन धन पायो मधील भुमिकेची प्रचंड चर्चा रंगली होती. तिने अगदी मोठ्यामोठ्या अभिनेत्रींना साजेशा अशा भुमिकेला तोड दिल्याचही म्हटलं जात होतं, याच सिनेमाच्या दरम्यान ती जखमी झाली होती. आणि तरीदेखील तिने आपली शुटिंग पुर्ण करत आपल्यातली हिम्मत दाखवली होती. सोनम कपूरच्या इतरही काही भुमिका आज रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या आहेत.
आता पुढे येणारा कलाकार खरचं एका पद्धतीने अष्टपैलू कामगिरी बजावणारा अभिनेता असं म्हणावं लागेल. कायमच एका साच्यात अडकून न राहता वेगवेगळ्या भुमिका आणि वेगवेगळ्या प्रयोगात काम करणारा हा नव्या दमाचा, नव्या पिढीचा अभिनेता आहे. अर्थातचं राजकुमार रावं. राजकुमारच्या बाबतीत जितकं बोलावं तितकं कमीच म्हणावं लागेलं. राजकुमार राव एका डान्सच्यावेळी जखमी झाला होता, परंतु हा डान्स त्याच्या सिनेमाकरता नसुन काही वेगळ्याच गोष्टीकरता होता. जखमी झाल्यानंतरही फार काही वेळ न लावता त्याने तो डान्स पुर्ण केला होता.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!