मित्रांनो! आपल्यापैकी बहुतेक रसिक प्रेक्षकांनी लोकप्रिय टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चश्मा पाहिली असेलच. जी एक प्रचंड हिट सिरीयल आहे आणि टेलिव्हिजन प्रेक्षकांना ती खूप आवडते. या सिरीयलच्या माध्यमातून लोकांना कौटुंबिक मूल्याच्या गोष्टीही शिकायला मिळतात.
आज आम्ही तुम्हाला याच सिरीयल मधील काही कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणार आहोत. ज्यां कलाकारांना सिरीयलमध्ये सुखाने वैवाहिक जीवन जगताना पाहिले जाते त्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला एक आश्चर्यजनक गोष्ट सांगणार आहोत, आणि ती म्हणजे यातील बहुतेक लोकप्रिय कलाकार हे आजही अविवाहित आहेत.
अंजली भाभी: लोकप्रिय अभिनेत्री नेहा मेहता यांनी अंजली भाभीची भूमिका बऱ्याच काळापासून साकारली आहे, तुम्ही तिला ओळखत असालच, जी खूप प्रसिद्ध आणि खूप चांगली अभिनेत्री मानली जाते. जरी नेहा मेहतांनी काही काळापूर्वी शो सोडला आहे तरी तुम्हाला तिच्याबद्दल हे माहिती नसेल की शोमध्ये तारकाची इतकी चांगली पत्नी बनलेल्या नेहाचे अद्यापही वास्तविक जीवनात लग्न झालेले नाही.
बबिताजी : बबिताजी, तुम्ही तिला चांगलीच ओळखता. सुंदर अभिनेत्री मुनमुन दत्ता ही भूमिका साकारत आहे. मध्यंतरीच्या वादग्रस्त चर्चांमधून आपण हे जाणताच की ती बऱ्याच काळापासून टप्पू सोबत रिलेशनशिपमध्ये आहे पण ती लग्नापर्यंत अद्याप यशस्वी होऊ शकली नाही आणि आजही ते दोघेही अविवाहितच आहेत. होय, ती अजूनही काही चांगल्या व्यक्तीच्या शोधात आहे जो तिची इच्छा पूर्ण करू शकेल.
सोढी भाई : मालिकेत रोशनसिंग सोढीची लोकप्रिय भूमिका यशस्वीपणे साकारणारा कलाकार म्हणजे आपला गुरचरण सिंग. त्यानेही हल्ली मालिका सोडली असली तरी तो अजूनही अविवाहित आहे आणि बरेच वय पार केल्यानंतरही, तो एक स्वतःसाठी एक अनुरूप मुलगी शोधत आहे. आशा करूया की ती सोढीला लवकरच मिळो.
अय्यर: बबिताजींचा नवरा जो शास्त्रज्ञ आहे अशा अय्यरची भूमिका तनुज महाशब्दे या मराठी कलाकाराने अतिशय उत्तम साकारली आहे. विशेष म्हणजे सिरीयल मध्ये बबिता सारख्या हॉट बायकोचा नवरा बनलेल्या तनुजचे अजून लग्न होणे बाकी आहे आणि त्यामागचे कारण माहित नाही तरी पण तो लग्नासाठी मात्र सदैव उत्साही दिसत असतो.
तर मित्रांनो! या सर्वांना त्यांच्या आयुष्याचा जोडीदार त्यांच्या मनासारखा लाभो ही आमच्या सर्व स्टार मराठीच्या टीम तर्फे सदिच्छा!!!