thakur-anoop-singh-bebhan-poster




Thakur Anoop singh Upcoming Marathi Movie BEBHAN 2017 Poster

ठाकूर अनुपसिंगचं ‘बेभान’ पोस्टर 

मराठी सिनेसृष्टीत अनेक चांगले विषय हाताळले जात आहेत, याचाचं परिणाम हिंदी सिनेसृष्टीत आपले नशीब अजमावणारे कलाकार मराठी सिनेसृष्टीकडे वळत आहेत. हिंदीत नावाजलेल्या अनेक कलाकारांची  उदाहरणे देता येतील.Lai Bhari ‘लय भारी’ या सिनेमातून शरद केळकर, गुरु सिनेमातून ‘मुरली शर्मा’ यांनी मराठी सिनेमात पदार्पण केले. ठाकूर अनूपसिंग या हिंदी सिनेसृष्टीतल्या अभिनेत्यालाही मराठी सिनेमांचा मोह आवरता आला नाही. दिग्दर्शक अनुप अशोक जगदाळे यांच्या Bebhan 2017 ‘बेभान’ या सिनेमातून ठाकूर अनुपसिंग मराठीत दमदार पदार्पण करणार आहे. वयाच्या २२ वर्षांपासून ठाकूर अनुपसिंगने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात छोट्या पडद्यापासून केली.

bebhan-marathi-movie-poster

 

Bebhaan बेभान या सिनेमातून ठाकूर अनुपसिंगचा राऊडी लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतचं या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे.सोशल मीडियावर पोस्टरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या पोस्टरवर ठाकूर अनुपसिंगचा रांगडा तसेच प्रेमात बेभान झालेला प्रियकर आपल्याला दिसून येतोय.

प्रेमाचा रंग लाल असल्याने हे पोस्टरदेखील लाल रंगाच्या बॅकग्रॉउंडवर बनवण्यात आला आहे. Mrunmayee Deshpande मृण्मयी देशपांडे आणि ठाकूर अनुपसिंग या दोघांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत. मधुकर (अण्णा ) उद्धव देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून प्रसाद देशपांडे हे सहनिर्माते आहेत. दिनेश देशपांडे लिखित आणि शांभवी फिल्म्स निर्मित हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

thakur-anoop-singh-bebhasn-movie-poster


Bebhaan 2017 Marathi Movie Mp3 Song Free Download

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here