'Smita Patil Memorial lecture' In Yashwant International Film Festival

 

यशवंत फिल्म फेस्टिवलमध्ये आशुतोष गोवारीकर यांचे  ‘स्मिता पाटील स्मृती व्याख्यान

चित्रपट रसिकांसाठी  विनामुल्य व्याख्यान

मुंबई : बहुचर्चित यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची नांदी २० जानेवारी रोजी झाली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, पुणे फिल्म  फाऊंडेशन , मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव रंगणार आहे. हा चित्रपट महोत्सव २० जानेवारी ते २६ जानेवारी २०१७ दरम्यान  चित्रपट रसिकांसाठी असणार आहे . महोत्सवाचे उद्घाटन प्रतिष्ठानचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी चतुरस्त्र अभिनेता पंकज कपूर यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल शरद पवारांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 

Yashwant International Film Festival

‘Smita Patil Memorial lecture’ In Yashwant International Film Festival

यावर्षी `स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेस’ प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर  हे  व्याख्याते म्हणून असणार आहेत.  स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘’मी सिनेमाकडे कसा पाहतो’’  ह्या विषयावर व्याख्यान दिले जाणार आहे.

२२ जानेवारी २०१७ रोजी , सायंकाळी ५.०० वाजता यशवंत चव्हाण सेंटर मध्ये हे व्याख्यान  होणार आहे.  व्याख्यान सर्वांसाठी विनामुल्य  ठेवण्यात आले आहे. जास्ती जास्त चित्रपट रसिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन महोत्सवाचे मुख्य समन्वयक महेंद्र तेरेदेसाई यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here