Marathi Music is going through alot of good changes these days. With these changes

several different Singers are coming up with their Independent Music Single andlikewise one of the most popular Artist, Singer Yogieeta Godboley know for her hits like

‘Holicha San Lai Bhari’ from film Lai Bhari, ‘Prabhat geet’ from ‘Aga Bai Arecha’ or herbollywood hit ‘Na Jis Din Teri Meri’ from film Traffic Signal and many more. Her work

alongside Ajay-Atul is remarkable.A lady with such variety of songs that she has presented had launched her own single “HEE ATHAVAN” last week.

गायिका योगिता गोडबोले ह्यांच्या “ही आठवण ” गाण्याचे ध्वनिफीत प्रकाशन!

मराठी संगीत विश्वात सध्या अनेक बदल होत आहेत. अनेक नावाजलेले गायक आणि गायिका त्यांचे स्वतःचे टॅलेंट दाखवण्यासाठी वेगेवेगळे प्रयोग करत आहेत. मराठी संगीत क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणजे गायिका योगिता गोडबोले. या नावाची ओळख करून द्यायची झाली तर आला होळीचा सण लय भारी (लय भारी), अग बाई अर्रेच्या मधील प्रभात गीत किंवा हिंदी सिनेमा ट्रॅफिक सिग्नल मधील, ना जिस दिन तेरी मेरी बात होती है… ही आणि या सारखी अनेक  हिट गाणी तिने गायली आहेत. मुख्यतः अजय अतुल सोबत तिने केलेलं काम उल्लेखनीय आहे.अशी हि गुणी गायिका तिचे नवीन रोमँटिक गाणे “ही आठवण” प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आली.

या गाण्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे, सत्य घटना आणि समाजाशी निगडीत विषयांवर चित्रपट बनविण्यास प्रसिद्ध असलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक मधुर भांडारकर हह्यांनी योगिताच्या गाण्याचे प्रकाशन केले. सध्या हिंदी सिनेविश्वात मराठी गायक-गायिकांना फारश्या संध्या मिळत नाहीत. मात्र भाषेपलीकडे जाऊन कलेला प्राधान्य देणारा दिग्दर्शक म्हणूनच मधुर भांडारकर यांची एक वेगळी ओळख आहे. ट्रॅफिक सिग्नल हा मधुर भांडारकर यांचा एक गाजलेला सिनेमा. त्यातील अनेक गाणी प्रसिद्ध होती. मात्र एक गाणे मधुर भांडारकर यांचे आवडते आहे ते म्हणजे “ना जिस दिन तेरी मेरी”. आणि हे गाणे मधुर यांनी योगिताकडून गाऊन घेतेले होते. योगिताच्या गायकीचा पूर्ण अंदाज मधुर यांना आहे आणि त्यामुळेच तिच्या या नवीन गाण्याचे प्रकाशन करण्यासाठी मधुर भांडारकर योगिताच्या एका विनंतीला मान देउन तिथे उपस्तित होते.

 

या प्रसंगी मधुर भंडारकर यांनी योगिता बद्दल सांगितले, कि “मी योगिता आणि तिच्या संपूर्ण टीम च Hee Athavan ‘ही आठवण’ या सुंदर गाण्याबद्दल अभिनंदन करतो, त्यांनी ज्या प्रकारे एवढे सुंदर गाणे बनवले आहे आणि ज्या प्रकारची ट्रीटमेंट दिली आहे ती फारच सुंदर आहे. ही आठवण हे गाणे योगिता सुंदर गायली आहेच पण मी आश्चर्यचकित आहे तिचे अभिनय कौशल्य बघून. योगीताने सिंगल गाणे बनवून एक चांगली सुरुवात केली आहे आणि मला खात्री आहे हा प्रवास तिला खूप उंचीवर नेईल”.

राहुल पाठक हे या गाण्याचे निर्माते आहेत. योगिता गोडबोले यांचे “HEE ATHAVAN” “ही आठवण” हे गाणे, एक रोमँटिक सॉंग असून, एका प्रेमिकेची विरह भावना आणि  प्रियकराच्या भेटीचं सुंदर वर्णन यात दाखवले गेले आहे. हे गाणे पावसातील नयनरम्य वातावरणात पुण्यात शूट केले आहे. वैभव जोशी यांनी ह्या गाण्याचे बोल लिहिले असून सौरभ ऋषिकेश आणि जसराज या प्रसिद्ध संगीतकारांनी संगीतबद्द केले आहे. श्रेयस शिंदे हे या गाण्याचे सिनेमटोग्राफर आहेत.