बाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उतरून जाणारी हिरकणी इतिहासात प्रसिद्ध आहे, तिचा शिवरायांनी राजदरबारात सन्मान केला आणि शिवराय म्हणाले; तुझ्यासारखी आई जोपर्यंत आमच्या स्वराज्यात आहे तोपर्यंत आमचं स्वराज्य सुरक्षित आहे. जगातील सर्वोच्च संस्कार ज्या ठिकाणी बघायला मिळतात ते सर्वोच्च पीठ जर कोणतं असेल तर ते म्हणजे रायगड.
मराठयांच्या घरात जन्माला येणार बाळ जन्मजात शिवप्रेमाचे शिवसंस्कार घेऊन जन्माला येते कारण मराठयांच्या लेकी, बाळ गर्भात असतांना त्याच्यावर शिवसंस्कार करतात. आमच्या वहिनी सौ.कोमल अभिजीत पाटील यांनी आपल्या बाळावर शिवसंस्कार व्हावे म्हणून असंच वेड धाडस केलं.
आपल्या गर्भात असलेल्या बाळावर शिवसंस्कार व्हावेत म्हणून आमच्या वहिनी आठव्या महिन्यात रायगडावर शिवचरणी नतमस्तक होण्यासाठी गेल्या. हा फोटो बघून मला मनात धस्स झालं, कारण आठव्या महिन्याच्या गर्भारपणात गडावर जर काही त्रास झाला असता तर…!
आपल्या बाळावर शिवसंस्कार करण्यासाठी या माऊलीने तर एक वेडं धाडस केलं. चक्क रायगड चढला आणि तो ही आपल्या आठव्या महिन्यात. जगातील सर्वोच्च संस्कार ज्या ठिकाणी बघायला मिळतात ते सर्वोच्च पीठ जर कोणतं असेल तर ते म्हणजे रायगड आणि त्यामागील ही कथा.
बाळाच्या काळजीने रायगडाचा कडा खाली उतरून जाणारी हिरकणी महाराष्ट्राच्या इतिहासात प्रसिद्ध आहे. आपल्या बाळाच्या प्रेमापोटी तिने केलेल्या साहसाचा शिवरायांनी राजदरबारात सन्मान केला आणि शिवराय म्हणाले; तुझ्यासारखी आई जोपर्यंत आमच्या स्वराज्यात आहे तोपर्यंत आमचं स्वराज्य सुरक्षित आहे आणि आज त्याच हिरकणीचे एक रूप आपल्या कोमल पाटील वहिनीमध्ये दिसते.
कोण चढेल तेवढा मोठा रायगड म्हणून नाक मुरडणाऱ्यांना सुद्धा लाज वाटेल अशी गोष्ट घडली. फोटो पाहून तर मलाही वाटलं कि इतकं का ते धाडस – “बाळाच्या जिवाचीही परवा नाही” पण मग तिच्या गर्भातूनही शब्द फुटले असावेत “आई, तू चढ. मराठ्यांची औलाद आहे, एवढ्या छोट्या चढाईने काही होणार नाहीये मला”. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केल्यानंतर घेतलेला हा फोटो तुम्ही या पोस्ट सोबत पाहू शकता.
आपल्या बाळांसाठी असं काहीतरी करणाऱ्या आणि आपल्या बाळावर चांगले संस्कार घडविण्यासाठी धडपड करणाऱ्या सौ कोमल अभिजित पाटील यांना आणि त्यांच्या सारख्या अनंत आया-बहिणींना स्टार मराठीचा मनाचा मुजरा. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत.
स्वराज्य माता राजमाता जिजाऊ
स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज
स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.