जन्माष्टमी सगळीकडे मोठ्या उत्साहात सगळेच पार पडतात… यादिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला आणि म्हणूनच हा दिवस आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये मोठ्या धूमधडाक्यात जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे… गावातील मंदिरात जन्माष्टमी पार पडणार आहे… यादिवसानिमित्त मंदिर आणि पाळणा खूपच सुंदर पध्दतीने सजवला आहे… सगळीकडे प्रसन्न वातावरण आहे. सोनी आणि सिध्दी खूप सुंदर दिसत असून नृत्य देखील सादर करणार आहेत… पण या शुभक्षणी आत्याबाईंचा मुलगा सरकार सोनीबरोबर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे हे बघून सिध्दी त्याला एक सणसणीत कानफाडीत मारते… आता हे शिवाला कळल्यावर काय होणार ? आत्याबाईंना हे कळल्यावर त्या हंगामा करणार हे नक्की…

या जन्माष्टमीच्या प्रसन्न वातावरणात घडलेली ही घटना शिवा आणि सिध्दीच्या आयुष्यात कोणत नवीन वादळ घेऊन येईल ? मालिकेमध्ये आता शिवा आणि सिध्दीच्या नात्याबद्दल सोनीला कळाले असून तिने शिवाला सांगितले आहे तीन महिन्यात सिध्दी मला वहिनी म्हणायला परवानगी देणार… शिवाचे चांगले वागणे हे जरी आत्याबाईंना दिलेल्या शब्दामुळे असलं तरीदेखील शिवाचे प्रत्येक क्षणाला सिद्धीला मदत करणे, तिची बाजू घेणे हे खरोखरच नाटक आहे की त्याच्या मनामध्ये नक्की काय आहे ? हे हळूहळू मालिकेमध्ये कळेलच… पण सरकारबरोबर झालेला हा प्रकार आत्याबाईंना कळल्यावर त्यांचे यावर काय म्हणणे असेल… हे प्रेक्षकांना कळेल मालिकेच्या येत्या भागांमध्ये… तेंव्हा नक्की बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.00 वा. आपल्या कलर्स मराठीवर…