मित्रांनो!, सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी शो जज म्हणून एका एपिसोडसाठी तगडे मानधन घेते. पोर्नोग्राफी प्रकरणात पती राज कुंद्राला (Raj Kundra) अटक झाल्यानंतर शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) जाम चर्चेत आहे. पतीला अटक झाल्यापासून शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. अगदी ‘सुपर डान्सर 4’च्या (Super Dancer 4 ) सेटवरूनही गायब आहे.
पतीला अटक झाली आणि त्याच्या दुस-याच दिवशी मला शूटींगला येणं शक्य नसल्याचं सांगून शिल्पा ‘सुपर डान्सर 4’च्या सेटवर गैरहजर राहिली. तिच्या जागी ऐनवेळी करिश्मा कपूर गेस्ट जज बनून शोमध्ये आली. यानंतर काल शनिवारी रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख हे स्पेशल गेस्ट बनून शोमध्ये आलेत.
आज रविवारी रात्री प्रसारित होणा-या एपिसोडमध्येही रितेश व जेनेलिया हेच कपल स्पेशल गेस्ट म्हणून दिसणार आहे.आता तर शिल्पा शोमध्ये परतणार का? हा एक प्रश्नच आहे. तूर्तास तरी याचं उत्तर देणं कठीण आहे. ‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’च्या एका एपिसोडसाठी जवळपास १८ ते २२ लाख रुपये मानधन घेते. सध्या शोपासून लांब असल्यामुळे शिल्पा शेट्टीचे जवळपास २ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
शिल्पा शोमध्ये लवकर परतणार असल्याची आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे. काही दिवसांपूर्वी ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये शिल्पाच्या जागी अभिनेत्री रवीना टंडनला विचारण्यात आले होते. पण रवीनाने नकार दिल्याचे समोर आले. रवीनाला नकार देण्याबाबत विचारण्यात आले होते. त्यावेळी ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवीना म्हणाली, ‘हा शो शिल्पाचाच असेल आणि तिलाही शोमध्ये काम करायला आवडेल.’
रवीना सध्या परदेशात आहे. ती ऑगस्ट महिन्यात भारतात परत येणार आहे. संबंधित सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शिल्पा शेट्टी ही शोचा एक महत्वाचा भाग होती आणि लवकरच ती शोमध्ये पुन्हा येईल अशी आशा करुया. तो पर्यंत गीता कपूर आणि अनुराग बासू हे परीक्षक म्हणून काम करत आहेत. त्यांच्यासोबत शोमध्ये हजेरी लावणारे पाहुणे कलाकार दिसणार आहेत.’
गेल्या १९ जुलैला शिल्पाचा पती राज कुंद्राला पोर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली. याच प्रकरणी शिल्पाचीही चौकशी करण्यात आली. यावेळी अधिकारी राज कुंद्रा यालाही सोबत घेऊन गेले होते, तेव्हा राजला पाहून शिल्पा कोसळली होती. तिला अश्रू अनावर झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा क्राइम ब्रँचचे अधिकारी जुहू येथील शिल्पाच्या घरी पोहोचले तेव्हा शिल्पा राजला बघून रागाने ओरडली होती.
या केसने परिवाराची बदनामी केली आहे. अनेक एंडोर्समेंट, बिझनेस डील्स हातून गेल्या आहेत. हे सर्व तू का केलंस? या प्रकरणामुळे आपली किती बदनामी झाली? , असे ती रडत रडत राजला म्हणाली होती. राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा घराबाहेर पडलेली नाही. सोनी टीव्हीसोबतही तिनं कुठलाही संपर्क केलेला नाही.
त्यामुळे ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत चॅनलनं पाहुण्या कलाकारांसोबत शो पुढं चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.पती राज कुंद्राच्या अटकेनंतर सुपर डान्सरच्या या सीझनमध्ये तरी शिल्पा शेट्टी परतेल याची शक्यता कमी आहे. कदाचित आता थेट शोच्या पुढच्या सीझनमध्येच ती वापसी करेल.