मित्रांनो!, स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका या रसिक प्रेक्षकांमध्ये तुफान लोकप्रिय होतांना दिसत आहेत. त्यातही विशेष करून ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत. अलिकडेच या मालिकेने तब्बल ४०० भागांचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. त्याबद्दल स्टार मराठी टीम तर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन!. या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.
अभिनेत्री सीमा घोगळे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. सध्या ती, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेत विमल ही भूमिका साकारत आहे.अभिनेत्री असण्यासोबतच सीमा उत्तम नृत्यांगना आहे. यापूर्वीही सीमा घोगळेने काही मालिका, नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सीमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असते. त्यामुळे अनेक वेळा ती तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते.
उत्तम अभिनय आणि सौंदर्य यामुळे सीमाचे अनेक चाहते आहेत. सर्वात महत्वाचे गेल्या वीस वर्षांच्या आधीपासूनच ती पासून रंगमंचावर काम करतेय ही अभिनेत्री.तिने अनेक गाजलेल्या नाटकांतून भूमिका साकारलेल्या आहेत. सीमाने अनेक वर्षांच्या काळात बहुतेक गाजलेल्या नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा, सुरक्षित अंतर ठेवा, रात्रीस खेळ चाले, 26 52 उन्हापावसाची बेरीज वजाबाकी, शिकस्त, टू बी कन्टिन्यूड ही तिची अलीकडच्या काळातील गाजलेली नाटकं आहेत.
सीमा खासगी आयुष्यात विवाहित असून एका मुलाची आई आहे. अमित पारकर हे तिच्या पतीचे तर वरद हे मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे सीमा छोट्या पडद्यावर फारशी अॅक्टिव नसली, तरी गेल्या बऱ्याच वर्षांपासून ती रंगभूमीवर कार्यरत आहे. मात्र “खुलता कळी खुलेना” या मालिकेने स्वतंत्र अशी वेगळी ओळख मिळवून दिली असल्याचे सीमा सांगते.
मानसी-विक्रांत आणि मोनिका या तीन व्यक्तिरेखांभोवती गुंफण्यात आलेली खुलता कळी खुलेना ही झी मराठी वरील मालिका खूपच गाजली होती. मयुरी देशमुख, अभिज्ञा भावे, ओमप्रकाश शिंदे यांच्या मुख्य भूमिका असणारी ही मालिका त्यावेळी मराठी रसिक प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. याच मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली होती.
यापैकीच एक पात्र म्हणजे ‘बकुळा’. मोनिकाची पाठराखीण म्हणून बकुळाचा मालिकेत प्रवेश झाला. खास संवाद शैलीमुळे बकुळाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची वेगळी जागा निर्माण केली आहे. बकुळा या भूमिकेला थोडा ग्रे शेड होती. त्यामुळे हे पात्र लक्षात राहिलं. आणि ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे नाव होतं सीमा घोगळे-पारकर होय!, ही तीच जी आता साकारतेय आई कुठे काय करते’ मालिकेतील विमल.