तुमच्या आयुष्यात “पॉज”चे बटन आहे का? साराह व ताहिर यांची “टाईम आऊट” ही नवी वेबसिरिज

लग्न व त्यानंतरचे आयुष्य याची जुळवाजुळव करताना चांगलीच कसरत होते. त्यात सध्याच्या तरूण मंडळींना करिअर, सोशल लाईफ, स्वत:ची स्पेस याच्याशी तडजोड जमत नाही. अशीच काहीशी तारेवरची कसरत राहुल आणि राधा करत आहेत. प्रेमात आकंठ बुडलेली जोडपी लग्न तर मोठ्या हौसेने करतात, मात्र त्यांनतरच्या जबाबदाऱ्या घेणं सर्वांना जमत नाही. हे सर्व झालं रिअल लाईफचं. हाच विषय घेवून राहुल म्हणजे ताहिर भसीन व राधा म्हणजे सारहा जेन डायस यांच्या रिल लाईफमध्ये मिडलाईफ क्रायसिस झाले आहेत. एका वेगळ्या विषयावर आधारित अशी “टाईम आऊट” ही वेबसिरिजचा पहिला एपिसोड नुकताच प्रदर्शित झाला आहे.

 एका विवाहित जोडप्याच्या आयुष्यात त्यांना कशा आणि काय समस्या येतात आणि त्यात हे देघं काय मार्ग काढतात कथेवर ही सिरिज आहे. लग्नासारख्या बंधनात अडकूनही साराह आणि ताहिर आपल्या लाईफला कसा पॉज देतात हे गंमतीदार रित्या या सिरिजमध्ये दाखवले आहे. एक मेड फॉर इच अदर कपल व त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेम्स हे दिग्दर्शक दानिश असलम यांनी उत्तम पद्धतीने मांडले आहेत. राधा ही राहुलच्या आयुष्यातील एशी व्यक्ती आहे जी सतत राहुलच्या आजूबाजूला असते व तिला प्रत्येक प्रसंगाशी सामना करावा लागतो.

या वेबसिरिजमध्ये काम करण्याआधी ताहिर व साराह दोघांनीही काही जोडप्यांसोबत बातचीत केली होती. त्यामुळे राहुल व राधाची भूमिका अधिक रंगतदार करू शकलो असे या दोघांनीही म्हटले आहे. लग्नानंतर साहजिकच मुलाची जबाबदारी ही पुढची पायरी असते. नेमक्या याच जबाबदारीसाठी राहुल तयार नाही. याच गोष्टीवरून कशाप्रकारे त्यांच्यात वाद होतात व शेवटी ते यावर काय निर्णय घेतात यासाठी ही वेबसिरिज आवर्जून पाहा. साराह व ताहिर यांनी बॉलीवूडमधील अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. “टाईम आऊट” ही वेबसिरिज 28 नोव्हेंबरपासून वूटवर प्रदर्शित झाली आहे. 6 एपिसोडची ही सिरिज आहे.

Sarah Jane Dias and Tahir Raj Bhasin