Upcoming Sangharsh Yatra Marathi Movie Sharad Kelkar, Shruti Marathe

“संघर्षयात्रा” १४ एप्रिल रोजी होणार प्रदर्शित!!
 
– साकार राऊत दिग्दर्शित चित्रपट 
– शरद केळकर, श्रुती मराठे मुख्य भूमिकेत 
– अमृता फडणवीस यांनी गायले गीत 
 Sangharsh Yatra ‘संघर्षयात्रा’ हा बहुचर्चित चित्रपट आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. येत्या १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.
युवा दिग्दर्शक साकार राऊत यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले आहे. या चित्रपटाची मुख्य संकल्पना आणि निर्मिती ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व बीजेपी चित्रपट युनियनच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. सूर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विराज मुळे, विशाल घार्गे यांनी लिहिले आहेत. शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेल्या पोवाडा अनिरुद्ध-अक्षय या जोडीने संगीतबद्ध केला आहे. हा पोवाडा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता देवेद्र फडणवीस यांनीही चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे.  हे शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिलेले असून, संगीत श्रीरंग उर्हेकर यांचे आहे. सनिश जयराज यांनी छायांकन, अनंत कामत यांनी संकलन केले आहे.
‘काही कारणांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब झाला होता. आता या चित्रपटात काही सुचवलेले बदल करण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अत्यंत संवेदनशील असं हे कथानकाला नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळेल,’ असं दिग्दर्शक साकार राऊत यांनी सांगितलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here