Sairat (2016) Ringtones

 

१) सैराट या सिनेमाचं ७० दिवसांचं शेड्युल होतं. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील नागराजच्या गावी या सिनेमाचं शुटिंग करण्यात आलंय. गाण्यात दिसणारी विहीर देखील करमळा तालुक्यातील आहे.

२) सिनेमातील अधिकाधिक भाग हा नागराजच्या गावातील आहे.नागराजने बालपणीतला घालवलेल्या बराच जागा या सिनेमात वापरण्यात आल्या आहेत.

३) सैराट सिनेमातील अभिनेता अकाश ठोसर (पर्शा) हा पेहलवान होता. त्याने या सिनेमासाठी जवळ जवळ ८ ते ९ किलो वजन कमी केलं आहे. नागराजला आकाश एका रेल्वे स्टेशनवर दिसला. तेथे त्याने सैराटच्या हिरोसाठी त्याची निवड केली.

४) सैराटच्या शुटिंगनंतर पहिल्यांदा आपल्याला रूपेरी पडद्यावर पाहून आकाश खूप भावूक झाला होता.(बघा ‘सैराट झालं जी’ गाण्याचा अफलातून संपूर्ण व्हिडिओ)

५) पर्शा हा सिनेमात गरिब कुटुंबातील आहे. आणि हे नाटकीवाटू नये यासाठी त्यांनी त्या घराची भिंत पाडली आहे.

६) सैराटमधील नायकासाठी नागराज मंजुळेने अनेक ठिकाणी ऑडिशन घेतलं. मात्र त्यांना कमी बोलणारा आणि अगदी शांतमुलगा हा आकाशमध्येच दिसला.

७) नागराज मंजुळेच्या सिनेमातील प्रत्येक माणूस खरा वाटतो. कारण नागराजची आवड खूप खरी असते. सैराटमध्ये देखील नागराजने त्याच्या गावातील आणि गावाजवळची माणसंघेतली आहेत.

८) सैराट सिनेमाचं शुटिंग हे फँड्री रिलिज झाल्याच्या अगदी १५ दिवसांनी करण्यात आलं आहे. (ऎका ‘सैराट’ सिनेमातील सर्वच गाणी एकत्र एकाच ज्यूक बॉक्समध्ये)

९) नागराज मंजुळेचा फॅंड्री सिनेमाही त्याच्या आयुष्यावर आधारलेला होता. आणि सैराटमधील ही काही गोष्टी या नागराजच्या प्रत्यक्ष आयुष्यात घडल्या आहेत. त्यातील एक सीन आहे ज्यामध्ये आर्चीच्या चपल्लांवर पर्शा फूल ठेवतो.

१०) नागराज मंजुळे आपल्या सिनेमात किंवा शॉर्ट फिल्ममध्ये प्रत्येकवेळी नवीन कॅरेक्टर घेऊन येतो. आणि त्या प्रत्येकाला तो एक वेगळं स्थान मिळवण्यास खासप्रयत्न करतो. पिस्तुल्यामधून त्याने त्या लहान मुलाला ओळख निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी फॅंड्रीमधील जब्याला आणि आता सैराटमधून पर्शा आणि आर्चीला ते स्थान मिळवून देण्यास सुरूवात झाली आहे.

११) सैराटच्या एका सिनमध्ये पर्शा म्हणजे आकाश रेल्वेसोबत धावत आहे. आणि धावताना त्याच्या समोर बोरीच्या झाडाला तो आदळतो. आणि त्याच्या अंगावर बोरीचेसर्व काटे लागतात.

१२) आकाश ठोसर हा सिनेमाची शूटींग संपेपर्यंत नागराजच्याच घरी राहायचा. नागराजने कायम आपल्या सिनेमातील कलाकारांसोबत खेळीमेळीचं वातावरण ठेवतो.

१३) सिनेमात पार्शाची भूमिका साकारणारा मुलगा हा खरा अपंग आहे. सिनेमातील बाळूचं खरं नाव तानाजी आहे.

१४) सैराटची अभिनेत्री रिंकू राजगुरूला (चित्रपटातली आर्ची) बुलेट शिकून घ्यावी लागली. रिंकू एका गाण्यात ट्रॅक्टर चालवतानाही दिसणार आहे. रिंकू राजगुरूची सैराटसाठी अभिनेत्री म्हणून निवड झाली तेव्हा ती सातवीत होती, आता ती इयत्ता नववीत आहे.

१५) सैराटमधील अभिनेत्री नागराज अगदी स्टाँग हवी होती.आणि रिंकु तशीच आहे. नागराजने रिंकुमध्ये त्याच्या आई, आत्या, ताई आणि आजीचे गुण टाकले आहेत. १६) सैराटचं शुटिंग झालं तेव्हा रिंकू सातवीत होती. आणि ती इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. रिंकु राजगुरू अकलुजला राहणारी आहे. सैराटमध्ये रिंकु ही एका पाटलाचीमुलगी दाखवली आहे.

१७) ‘सैराटं झालं जी’ हे गाणं दक्षिणेतल्या गायिका चिन्मयी श्रीपदा यांनी गायलं आहे. चिन्मयी यांनी संगीतक्षेत्रात ए.आर रहमान यांच्यासोबत काम केलं आहे. चिन्मयी यांनी हे मराठी गाणं गायलं आहे. तर ‘आताच बया का बावरलं’ हे गाणं गायिका श्रेया घोषाल यांनी गायलं आहे.

१८) सैराट हा अस्सल मराठी शब्द आहे, तुकारामांनीही त्यांच्या अभंगात अनेकदा सैराट शब्द वापरला आहे, सैराटम्हणजे सुसाट, वेगवान. सैराटचं संपूर्ण शुटिंग सोलापूरच्या करमाळा तालुक्यात झालं आहे. गाण्यात दिसणारी विहिर करमाळा तालुक्यातील आहे.

 

अप्रतिम चित्रपट सर्वांनी पहावा असा येत्या 29 तारखेला येतोय सैराटच्या संपूर्ण टीमसाठी खुप खुप शुभेच्छा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here