आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीला एक नवी मालिका येणार आहे, ती म्हणजे येऊ कशी कशी मी नांदायला. ते या मालिकेत कोण काम करतय आणि कोण नाही हे आता आपण जाणून घेणार आहोत. कारण को’रो’ना नंतर ही मालिका प्रसिद्ध होणार आहे. मालिकेचं नाव ही खूप युनिक आणि लोकप्रिय असं आहे.
“येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता झी मराठी वाहिनीवर प्रसारित होत आहे. मालिकेचे जुळून आलेले कथानक आणि त्यातील जाणकार कलाकार मंडळी ही या मालिकेची जमेची बाजू असल्याने अल्पावधीतच ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.
ह्या मालिकेसाठी झी वाहिनीने त्यांच्या जुन्या मालिकांच्या वेळेत बदल केलेला पाहायला मिळाला. नवी मालिका लवकरात लवकर फेमस होण्यासाठी केलेला हा बदल कलाकारांनी त्यांच्या अभिनयातून सार्थकी ठरवलेला पाहायला मिळतोय.
‘अन्वीता फलटणकर’ हिने स्वीटूची भूमिका साकारली आहे. ह्यापूर्वीही तिला तुम्ही बऱ्याच चित्रपटांत पाहिलं असेल, कदाचित तुम्ही तिला ओळखलं नसेल पण २०१४ सालच्या टाईमपास चित्रपटात आणि २०१९ सालच्या गर्ल्स ह्या चित्रपटात ती झ’ळ’क’ली होती. इतकेच नव्हे तर ती काही जाहिरातीतूनही प्रेक्षकांसमोर आली होती.
शाल्व किंजवडेकर हा या मालिकेत नायकाच्या अर्थात ओंकारच्या भूमिकेत झळकत असून त्याच्या सहजसुंदर अभिनयाचे खूप कौतुक होत आहे. या मालिकेअगोदर शाल्वने “अलिबाबा आणि चाळिशीतले चोर” हे पहिलं व्यावसायिक नाटक साकारलं तिथून त्याला हं’ट’र चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर एक सांगायचंय, बकेट लिस्ट, डे’ड ए’न्ड सारख्या चित्रपटातून त्याने काम केले आहे. शाल्वला फिल्ममेकींगचीही आवड असून ‘अंतरंग’ हा लघुपट त्याने बनवला आहे. या दोन्ही प्रमुख कलाकारांइतकीच सहकालाकारांची उत्तम अशी साथ या मालिकेला लाभली आहे आज या मालिकेतील सहकलाकारांची खरी नाव आपण जाणून घेऊयात…
स्वीटूचे आई बाबा- भागो मोहन प्यारे मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ‘दीप्ती केतकर’ यांनी या मालिकेत स्वीटूच्या आईची अर्थात नलिनीची भूमिका साकारली आहे. आर्थिक परिस्थितीशी दोन हात करत एका आईला कोणकोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते हे नलिनीच्या भूमिकेतून दिसून येते.
तसेच एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रमुख म्हणून वसंतरावांची अर्थात स्वीटूच्या बाबांची तारेवरची कसरतही या मालिकेतून पाहायला मिळत आहे ही भूमिका ‘उदय साळवी’ यांनी अगदी सुरेख बजावलेली पाहायला मिळते. या मालिकेअगोदर घाडगे अँड सून सारख्या मालिकेतून ते प्रेक्षकांसमोर आले आहेत.
ओंकारचे आई बाबा- अभिनेत्री ‘शुभांगी गोखले’ यांनी ओंकारची आई म्हणजेच मालिकेतील शकूची भूमिका साकारली असून त्यांच्या या भूमिकेचे भरभरून कौतुक केले जात आहे. अर्थात त्यांच्या सहजसुंदर अभिनय कौशल्याला प्रेक्षकांकडून मिळालेली ही आणखी एक पावतीच म्हणावी लागेल.
मालिकेत ओंकारच्या वडिलांची भूमिका साकारली आहे ‘मिलिंद जोशी’ या ज्येष्ठ कलाकारानी. मालिकेत त्यांच्या भूमिकेला सध्या फारसा वाव मिळत नसला तरी पुढे जाऊन या भूमिकेचे खरे रूप अधिक स्पष्ट होत जाईल.
स्वीटूच्या काकू- स्वीटूच्या काकूंची भूमिका अभिनेत्री शुभांगी भुजबळ यांनी साकारली असून या मालिकेअगोदर व्हय मी सावित्रीबाई, पतंगाची दोरी, चार दोन तुकडे, संगीत एकच प्याला, जु’गा’ड, इयत्ता, गाव गाता गजाली अशा नाटक, मालिका आणि चित्रपटातून काम केले आहे. ह्यामालिकेत त्यांचा रोल कमी असला तरी त्यांच्या उत्कृष्ठ अभिनयाने त्याला रंग चढतो.
या सर्व चांगल्या कलाकार असलेली कलाकृती लवकरच आपल्याला भेटीला येत आहे. सहर्ष सर्वांचे स्वागत करा. आणि शुभेच्छा सर्वाना.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.