सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्याच गोष्टीचा विजय होतो असे म्हंटले जाते. तसेच कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका घाडगे & सून, लक्ष्मी सदैव मंगलम्, नवरा असावा तर असा आणि बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेमध्ये होळी आणि रंगपंचमीचे विशेष भाग या आठवड्यामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. मालिकांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. बाळूमामा मालिकेमध्ये होळी पारंपारिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे. तेंव्हा नक्की बघा लाडक्या मालिकांचे हे विशेष भाग या आठवड्यामध्ये ६.३० वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

घाडगे & सून मालिकेमध्ये कियाराचे ती गरोदर नसल्याचे सत्य अक्षयसमोर आले आहे परंतु तो हे सत्य घरच्यांना सांगू शकत नाहीये. याच कारणामुळे त्याच्या वागण्यामध्ये झालेला बदल, चिडचिड ही अमृता, माई आणि घरातील इतरांना दिसून येते आहे पण, त्यामागील कारण मात्र कोणाला अजूनही समजलेले नाही. या आठवड्यामध्ये होळीच्या दिवशी कियारीचे हे सत्य अमृतासमोर येणार असून कियाराने घाडगे परिवारासोबत आणि तिच्यासोबत केलेलं इतक मोठं कारस्थान ती घरच्यांना आणि अक्षयला सांगू शकेल ? कोणत्या अडचणी तिच्यासमोर येतील ? आणि हे समजल्यावर माई आणि घरातील इतर सदस्य कसे स्वत:ला सावरतील ? हे बघणे रंजक असणार आहे. तसेच रंगपंचमी देखील घाडगे सदन मध्ये साजरी केली जाणार आहे.

सगळ्यात वेगळ्या प्रकारे होळी आणि रंगपंचमी नवरा असावा तर असा या कार्यक्रमामध्ये साजरी करण्यात आली आहे. आपल्या सगळ्यांची लाडकी हर्षदा ताई हा सण साजरा करण्यासाठी खास वरळी कोळीवाडा मध्ये गेल्या. तेथील कुटुंबसोबत हा सण त्यांच्या पद्धतीने मोठ्या उत्साहत साजरा केला आहे जो प्रेक्षकांना या आठवड्यामध्ये बघायला मिळणार आहे. या दरम्यान त्यांनी सांगितल कि, हा सण त्यांच्यासाठी देवळीपेक्षा मोठा असतो. या सणानिमित्त महिला आणि पुरुष खास पारंपारिक पोशाख परिधान करतात तसेच होळी कश्याप्रकारे साजरी केली जाते ते देखील त्यांनी यावेळेस सांगितले. रंगपंचमी देखील तितकीच खास असते. रंगपंचमी साठी रंगाची उधळण नकरता मज्जेदार खेळ देखील खेळण्यात आले आहेत. तेंव्हा नवरा असावा तर असा या कार्यक्रमाचा हा विशेष भाग नक्की बघा कलर्स मराठीवर.

लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेमध्ये देखील प्रेक्षकांना होळी आणि रंगपंचमीची धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे. सगळे खूप उत्साहात रंगपंचमी साजरी करणार आहेत. याच दरम्यान लक्ष्मीला अबोलीच्या कारस्थानांबद्दल कळणार आहे… तिने अजिंक्यच्या विरोधात काहीतरी खेळी रचली आहे आणि ज्याद्वारे ती त्याला कुठल्यातरी गोष्टीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्ष्मीला होळीच्या दिवशी करणार आहे. अजिंक्यला लक्ष्मी कशी वाचवेल ? ही रंगपंचमी मल्हार, अबोली आणि लक्ष्मीच्या आयुष्यात कोणते बदल घेऊन येईल ? हे नक्की बघा.