Rajesh Khanna

हिंदी सिनेमा किंवा सिनेसृष्टीत जर सर्वप्रथम कोणत्या अभिनेत्याला आपण सुपरस्टार म्हणून ओळखत असू तर ते होते, राजेश खन्ना. राजेश खन्ना यांना अनेक गोष्टींसाठी नवाजल्या गेलं. त्यांच्या खास अभिनयाच्या शैलीतून त्यांनी रसिकप्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी छबीच उमटवून सोडली. डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची प्रेमकहाणी देखील त्या काळात गाजली. आणि अहमदाबाद येथील नवरंगपुरा स्पोर्ट क्लब याठिकाणी डिंपल कपाडिया आणि राजेश खन्ना यांची पहिली भेट झाली होती. त्या काळात ७० च्या दशकात राजेश खन्ना हे एक चीफ गेस्ट अर्थात प्रमुख अतिथी म्हणून त्या स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात उपस्थित होते. इथे झालेल्या कार्यक्रमात पहिल्याच ओळखीत राजेश खन्ना यांच डिंपलवर प्रेम जडलं होतं. नंतर या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या दोघांच्या ओळखीत, नंतरच्या भेटीत अवघ्या चार दिवसात दोघेही लग्नासाठी तयार झाले. महत्त्वाची खासियत म्हणजे यावेळी डिंपल ही केवळ साडेपंधरा वर्षांची तर राजेश खन्ना हे ३० वर्षांचे होते.
त्या काळात समीकरण असं तयार झालं होतं की, डिंपल कपाडियासाठी राजेश खन्ना म्हणजे अगदी स्वप्नातला राजकुमार सत्यात अवतरणं. आणि डिंपल त्याच्या प्रेमात अगदी बुडाली होती. लग्न करताना राजेश खन्नांनी तिला अट घातली की, लग्नानंतर तिने सिनेसृष्टीत काम करायची गरज नाही. परंतु त्या दरम्यान डिंपलचा बाॅबी सिनेमा हिट गेला आणि लग्नानंतरही डिपंलला आपली प्रसिद्धी पाहून पुन्हा काम करण्याचा मोह आवरला नाही. या गोष्टीनेच कदाचित दोघांमधे पहिल्यांदा वादाची ठिणगी पडली. त्याचकाळी आधीच्या थोड्या फ्लाॅप गेलेल्या सिनेमांनंतर राजेश खन्ना यांनी सौतन मधून पुनरागमन केलं. त्यावेळी राजेश खन्नांची जवळीक झाली ती अभिनेत्री टीना मुनीम यांसोबत. ही जवळीक डिपंलला अस्वस्थ करून गेली आणि तिचा राग वाढत गेला. एकदा सिलसिले चित्रपटाच्या शुटींग दरम्यान डिंपल व राजेश खन्ना दोघेही माॅरेशियस येथे होते. याठिकाणी डिंपलने राजेश खन्ना यांना टीना मुनीम सोबत प्रत्यक्ष रोमान्स करताना अनेकदा पाहिले. आणि रागाच्या भरात डिंपल या मुंबईला निघून आल्या. जाताना डिंपल मात्र एक नोट ज्यात लिहिलं होतं की, “आय लव्ह यू, गुड बाय.” अशी मागे राजेश खन्ना यांच्याकरिता सोडून गेल्या आणि त्या गोष्टीला समजूनही राजेश खन्ना यांनी हलक्यात घेतलं. त्यानंतर “आशिर्वाद” या त्यांच्या घरीही डिंपल कपाडिया कधीच गेल्या नाहीत. डिंपल पासून वेगळं राहून राजेश खन्नांनी घटस्फोट मात्र घेतला नव्हता. परंतु आपली पत्नी डिंपल हीला त्यांनी संपत्तीमधून मात्र बेदखल केलं आणि आपल्या दोन मुली ट्विंकल खन्ना व रिंकी खन्ना यांच्या नावे तब्बल एक हजार कोटींची मालमत्ता बहाल केली. असंही म्हणतात की, राजेश खन्नांचा जावई अक्की अर्थात अक्षय कुमार, राजेश खन्नांचे खास मित्र व डॉक्टर दिलीप यांच्या समोर राजेश खन्नांच्या मालमत्तेच्या वाटपाचे वाचन केले गेले. खरचं ही गोष्ट जरा अजबचं आहे की, हजारोंच्या संपत्तीच्या वारसातला एकही हक्क पत्नीला मिळत नाही.