आवडत्या मालिकेत काम करत असलेल्या कलाकार किती मानधन घेतात ? हे जाणुन घेण्याकडे प्रेक्षकांचा फार कल असतो. त्यात सध्या मराठी मालिका खूप लोकप्रिय होत आहेत. साहजिकच मराठी प्रेक्षक त्या मालिका पाहणारच.
त्यात कलर्स मराठी वाहिनीवर “ राजा राणीची गं जोडी ” ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. त्यातील अनेक कलाकार आज प्रसिद्ध झाले आहेत. घराघरात पोहचले आहेत. चला तर मग मालिकेत काम करणाऱ्या काही प्रमुख कलाकरांचे मानधन जाणुन घेऊयात.
संजनाची भूमिका अभिनेत्री शिवानी सोनार ही साकारत आहे. तिच्या भूमिकेचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आज ती घराघरात पोहचलेली सुनबाई आहे. शिवानी सोनार ही मालिकेच्या प्रत्येक एपिसोड साठी १०००० हजार रुपये घेती. तर महिना दीड ते दोन लाखांच्या घरात जातो.
त्यात रणजीतची भूमिका अभिनेता मनीराज पवार हा साकारत आहे. तो एका एपिसोड साठी तब्बल ८००० हजार रुपये घेतो. तर महिना एक ते दीड लाख रुपये.
संजीवनीच्या आईची भूमिका कल्याणी चौधरी या साकारतात. त्या प्रत्येक एपिसोड साठी ४००० हजार रुपये घेतात. तर महिना पन्नास हजार ते १ लाख रुपये मिळतो.
संजीवनीच्या वडिलांची भूमिका अभिनेता श्रीकांत यादव हा साकारतो. तो एका एपिसोड साठी २००० हजार रुपये घेतो. तर महिना पन्नास हजार ते एक लाख मिळतात.
मालिकेत एक भूमिका खूप गाजत आहे. तिचं खरं नाव आहे श्वेता खरात. ती एका एपिसोड साठी ३००० हजार रुपये मानधन घेती.
संजीवनीच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री रश्मी जोशी साकारत आहे. प्रत्येक एपिसोड साठी रश्मी ४००० हजार रुपये घेतात.
रणजीतच्या आईची भूमिका अभिनेत्री शुभांगी गोखले ही साकरत आहे. त्या प्रत्येक एपिसोड साठी २००० हजार घेतात.
अजय पुरकर हे सुद्धा मालिकेत खूप उत्तम भूमिका करत आहेत. ते एका एपिसोड साठी ४००० हजार मानधन घेतात. अश्या प्रकारे सर्वच कलाकार मालिकेत खूप उत्तम काम करत आहेत. ज्यामुळे मालिका रसिकांच्या पसंतीस पडत आहे.