पत्रकार नेमके असे काय बोलले ज्यामुळे राधिका भडकली?
मराठी आणि बॉलिवूडमधील बोल्ड आणि ब्युटिफूल अभिनेत्री राधिका आपटे नेहमीच कोणत्या ना कोणत्या विषयावरुन चर्चेत राहिली आहे. राधिका ही कॉन्फिडंट अभिनेत्री आहे.
राधिकाने आतापर्यंत निवडलेल्या चित्रपटांची, शॉर्ट फिल्म्सची कथा उत्तम आहे आणि प्रेक्षकांना कथेसह राधिकाचा अभिनय पण आवडला आहे.
राधिकाचे कित्येक फॅन्स आहेत पण आता मात्र असे काय घडले ज्यामुळे राधिका चिडली, भडकली?
सध्याच्या राधिकाच्या भडकण्याचे कारण एकच असू शकते, ते म्हणजे ‘पार्श’ चित्रपटातील राधिकाच्या इंटिमेट सीन विषयीची चर्चा. मुळात चित्रपटातील एखादा सीन लीक होणे आणि त्या एका लीक सीनवर समोरील व्यक्तीच्या वागणुकीविषयी बोलणे हे अत्यंत चुकीचे आहे.
इंटिमेट सीन हा चित्रपटातील विषयाची गरज असू शकते आणि ‘पार्श’ चित्रपट पाहिल्यावर अनेकांना कळलेच असेल की एखाद्या परिस्थितीमागील गोष्ट समजून घेण्यासाठी तो सीन किती महत्त्वाचा होता. महत्त्वाचा म्हणण्यापेक्षा गरजेचा होता
असो! जे समजुतदार आहेत ते अगोदरच समजून गेले आहेत आणि ज्यांना अजूनही समजलं नसेल त्यांना राधिकाने तिच्या भाषेच समजावलं आहे