‘ Prem He ‘ Song Recording Ketaki Mategaonkar Zee Yuva
Prem He Song Zee Yuva Love Serie
केतकी आणि हृषिकेशच्या आवाजातील “प्रेम हे”
एका गुलाबी नात्याचे पदर उलगडणारी आणि प्रेमाच्या जगातील भावनांच्या हिंदोळ्यावर सफर घडवणारी Prem He “प्रेम हे” ही प्रेमकथांची मालिका Zee Yuva “झी युवा” … नवे पर्व, युवा सर्व, मनाने चिरतरुण असलेल्या प्रत्येकासाठी या वाहिनीवर लवकरच प्रदर्शित होत आहे. या प्रेम कथेच्या सिरीज मध्ये मराठी सिने इंडस्ट्रीमधील अनेक नामवंत कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत . या मालिकेच्या शीर्षक गीताचे रेकॉर्डिंग नुकतेच विलेपार्लेच्या बझ इन स्टुडिओ मध्ये झाले. कविता म्हणजे कमी शब्दात जास्त भावना! या भावना म्हणजेच प्रेम, विरह, मैत्री, गंभीर आणि साहित्यिक अशा विविध पैलू! या पैलूंना कवितेत शब्दबद्ध करण्याचे काम कसलेला कवीच करू शकतो. अशा या कसदार आणि सर्जनशील कवींच्या यादीत मंदार चोळकर याचे नाव आवर्जून घेतले जाते.
सर्वप्रथम चारोळी आणि त्यानंतर कविता रचत गीतलेखनाकडे वळलेला मंदार आज तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय कवी झाला आहे. त्याच्या कविता संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मुखी रुळलेल्या दिसून येत आहेत. अश्या ह्या मंदार ने ह्या मालिकेच्या शीर्षक गीताची जवाबदारी लीलया पेलली आहे. तर सध्याच्या तरुण संगीतकारांमध्ये, सर्वाधिक वैविध्यपूर्ण काम करणाऱ्या काही मोजक्या लोकांमध्ये ज्याचं नाव अग्रक्रमान घ्यावं लागत आणि आसपासच्या इतर संगीतात ज्याचं संगीत नेहमीच वेगळं आणि उठून दिसतं असा निलेश मोहरीर याने या गाण्याचं संगीत दिले आहे. जुन्या-नव्या सर्व कलावंतांसह काम करणारा हा एक हरहुन्नरी संगीतकार म्हणूनच विविध पुरस्कारांचा मानकरीही ठरलाय.
या गाण्याचं आणखी एक वैशिष्ठय म्हणजे या सुमधुर गाण्याचे दोन्ही गायक. हे गाणे अश्या गायिकेने गायले आहे जिचा वयाच्या चौथ्या वर्षी गाण्यांचा पहिला आल्बम निघाला अशी अतिशय सुमधुर गायिका केतकी माटेगावकर आणि तिला साथ दिली आहे सा रे गा मा पा आजचा आवाज चा विजेता गायक हृषीकेश रानडे याने. एवढ्या सगळ्या प्रतिभावान संगीतमय लोकांनी बनवलेलं गाणं आणि त्यावर मोठ्या पडद्यावरील नामवंत कलाकार झी युवावरीळ “प्रेम हे “ या मालिकेत रोमान्स करताना पाहणे नक्कीच उत्कंटावर्धक असेल.