मित्रांनो!, बॉलीवूडच्या या झगमगत्या दुनियेत नेहमीच आपण कुणाचे कुणाशी जुळल्याच्या किंवा घटस्फोटाच्या बातम्या ऐकत असतो. परंतु ही बातमी जरा हटके आहे. बॉलीवूड मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने आपल्या पतीला अद्दल घडविण्यासाठी चक्क परपुरुषासोबत विवाहबाह्य संबंध, ठेवले होते. आणि यातून पुढे विपरीत घडले.

बॉलिवूड मधील अनेक हिरोइन्सनी आजवर रसिक प्रेक्षकांच्या हृ-दयावर राज्य केलेय. बऱ्याच अभिनेत्री अश्या आहेत की त्यांनी विवाह केल्यानंतर बॉलिवूडला रामराम केला. आपल्या पतीच्या म्हणण्यानुसारच त्यांना राहावे लागले. आज आपण अशाच एका अभिनेत्रीविषयी माहिती करून घेणार आहोत, जी नवऱ्यासोबत राहिली पण जेव्हा तिला त्याच्या बाहेरच्या अफेअर्स बद्दल कळले तेंव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवण्यासाठी चक्क परपुरुषाशी विवाहबाह्य सबंध ठेवले होते.

या अभिनेत्रींचे नाव पूनम ढिल्लो असून ती केवळ तिच्या अभिनयासाठीच नव्हे तर तिच्या सौंदर्यासाठीही अजूनही चर्चेत असते. पूनमने बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देऊन आपली अभिनयाची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पूनमने आतापर्यंत ८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेय, परंतु ती तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच जास्त चर्चेत राहिली आहे.

आपल्या फिल्मी करियरच्या काळात पुनमला खूपच डिमांड होती. सुरुवातीलाच खूप चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळत होत्या. तिच्या करियर मधील पहिलाच चित्रपट हिट झाला होता त्याच नाव होत त्रिशूल. याच चित्रपटाच्या यशानंतर तिला बॉलिवूड मधून कामाच्या ऑफर्स मिळू लागल्या. दिग्दर्शक पूनम सोबत काम करण्यास इच्छुक होते. रमेश तलवार, यश चोप्रा बड्या नावांसोबत तिच्या अफेअरच्या बातम्या फेमस होऊ लागल्या होत्या.

परंतु पूनमने या सर्व बातम्या नाकारल्या. नंतर पूनम ढिल्लन हिची ओळख राज सिप्पी याच्या बरोबर झाली. त्यानंतर दोघांमध्ये देखील प्रेम संबंध सुरु झाल्याच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. पूनम ढिल्लनही त्याच्यावर प्रेम करू लागली होती. परंतु राज सिप्पी यांचे आधीच लग्न झालेले होते. माध्यमांमध्ये याची चर्चा सुरु झाल्यानंतर पूनम ढिल्लन हिने राज सिप्पी याची दुसरी पत्नी बनण्यास स्पष्टपणे नकार देऊन त्याच्याबरोबर असलेले नाते देखील तोडून टाकले होते.

सन 1988 मध्ये पूनमच्या आयुष्यात खुप मोठा बदल झाला होता. राज सिप्पी सोबतचे नाते तोडल्यानंतर पुनमच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर पुनमच्या जीवनात अजून एक व्यक्ती आली आणि त्या व्यक्तीच नाव होते, अशोक ठाकेरिया. दोघांची ओळख त्यांचे एका मित्राच्या घरी होळीच्या सणाच्या दिवशी झाली होती. त्यावेळी पूनम तिच्या वडीलांच्या दु:खातच होती. तिने तिचे दुःख विसरावे म्हणून अशोकने पूनमच्या अंगावर बादली भरून गार पाणी ओतले.

यासाठी पुनमला अशोकचा राग न येता उलट ती खूप खुश झाली आणि त्यानंतर त्यांच्यातील प्रेम वाढू लागले. प्रेमाचे रूपांतर लग्नात झाले. नंतर त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्येही झाली. अशोक नेहमीच त्याच्या कामात व्यस्त असायचा. म्हणून पूनमला तिचे फिल्मीजगत खुणावायला लागले. पूनमला पुन्हा पडद्यावर झळकायचे होते पण मनाजोगे काम मिळेना. दरम्यान तिला वैवाहिक जीवनात देखील त्रास होऊ लागला होता.

एके दिवशी अचानक तिला असे समजले की तिच्या पतीचे विवाहबाह्य संबंध आहेत म्हणून. तेव्हा त्यांच्यातील वाद विकोपाला गेले. दोघांचे जमेनासे होऊ लागले. असह्य झाल्यावर मात्र पूनम ढिल्लनच्या मनात पतीवर सूड उगवण्याच्या भावनेने जोर धरला. नवऱ्याला धडा शिकवायचा म्हणून मग तिनेही एका परपुरुषाशी विवाहबाह्य संबंध ठेवले. दोघांतील वाद अधिकच विकोपाला गेले होते.

त्यामुळे अखेर 1997 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. दोन्ही मुले तिच्याकडेच देण्यात आले. स्वतःच्या जीवाची व मुलांची देखभाल व्हावी म्हणून तिने एक बिझनेस सुरू केला. बिग बॉसमध्ये देखील ती सहभागी झाली होती. भाग घेतला. आता ती टिव्ही वरील मालिकांमध्येही काम करताने दिसते आहे. परंतु स्वतःच्या नवऱ्याला धडा शिकवण्यास गेली आणि पुढे हे सर्व विपरीत झाले.