थेट विक्री करणारा आघाडीच्या स्वीडिश ब्यूटी ब्रॅंड ओरिफ्लेम भावनिक पातळीवर ताजेपणा आणणारी उत्पादने बाजारात उतरवत आहे. फील गुड ही अपवादात्मक उत्पादनांची श्रेणी ग्राहकांचा मूड चांगला करण्यासाठी मल्टीसेन्सोरिअल शॉवर जेलचे आणि परफ्युमचे कलेक्शन घेऊन आली आहे. सुगंधातील भावनिक शक्तीपासून या उत्पादनांसाठी प्रेरणा मिळाली आहे. या उत्पादनांमध्ये मनुका, युझू, लिंबू, पुदीना यासारखे घटक वापरले असून त्यांचा गंध ठराविक भावना किंवा मूड निर्मितीसाठी केला जातो.
ओरिफ्लेमची फील गुड ही अशाप्रकारची पहिलीच श्रेणी असून यात लव्ह्ड अप आणि वेकअप ही दोन प्रकारची उत्पादने आहेत. याद्वारे आधी आनंद निर्मिती होते आणि नंतर त्या भावना वृद्धींगत होतात. ठराविक गंधाद्वारे प्रेमळ, उत्कट भावना निर्माण होतात, हे ओरिफ्लेमने जाणले. या उत्पादनांमध्ये प्लम्स वापरले असून ते खाताना जाणवणा-या गूढ भावनांसाठी ते ओळखले जाते. या उत्पादनांमध्ये अफ्रोडिझिअॅक गुणधर्मांसाठी ओळखली जाणारी काळीमिरीही वापरली आहेत. वेक अप या उत्पादनासाठी ब्रँडने मसालेदार आणि फळयुक्त युझू निवडले आणि भऱपूर ताजेपणा असलेल्या पुदिन्यांच्या पानांनी ते संतुलित केले.
सखोल स्वच्छता देणा-या फील गुड श्रेणीतील शॉवर जेलमध्ये त्वचेची काळजी घेणारे आवश्यक तेल असून त्यातून तुमचा मूडही चांगला होईल. ही दोन्ही उत्पादने साबणविरहित, पीएच संतुलित तसेच त्वचाशास्त्राने तपासलेली आहेत.