गुन्ह्याच्या मुळाशी जाण्याची पोलिसांची दुरदृष्टी
पहा “शौर्य- गाथा अभिमानाची”
दिनांक १३ जानेवारीला रात्री ९ वाजता झी युवावर पहा दहिसर क्राईमब्रँच युनिट १२च्या पोलीस टीम ने २००६ साली मुंबईशी काडीमात्र संबंध नसलेल्या हैदराबाद येथे घडलेल्या एका गुन्ह्याचा कसा छडा लावला त्याचप्रमाणे गुन्ह्यातील अनेक प्रकारांमधला एक प्रकार म्हणजे मिसींग केस. त्याच प्रमाणे आजवरच्या पोलिसी अभ्यासावरून पोलिसांनी हा नित्कर्ष काढलाय कि बेपत्ता व्यक्ती हि कधी ना कधी जिवंत किंवा मृतावस्थेत सापडतेच. खारघर येथे राहणाऱ्या पन्नास वर्षीय व्यक्तीच्या बाबतीत नेमकं असंच काहीसं घडलं … हसरा खेळकर जेरॉम दि. ३१ जानेवारी २००९ च्या दिवसांनंतर अचानक बेपत्ता झाला मिसिंग जेरॉमचं गूढ पनवेल क्राईमब्रँचच्या युनीट २ ने कसं उकळून काढलं …त्याचा बुरखा फेडणारी हि धक्कादायक कथा पहा १४ जानेवारीला रात्री ९ वाजता!!
सन २००६ मध्ये हैदराबाद मधील आलुकास ज्वेलरी शॉप मध्ये मोठी चोरी झाली. अख्खा भारतभर त्याची चर्चा सुरु होती. चोरीची स्टाईल मुंबईतील दहिसर पोलिसांना ओळखीची वाटली. विनोद नावाच्या मुंबईतील तडीपार गुंड, ज्याने मुंबईमध्ये अश्या प्रकारच्या चोऱ्या केल्या होत्या. पोलिसांना त्याचा संशय आला . पोलीस अधिकारी सुनील दरेकर यांनी त्यांच्या माणसांना कामाला लावले. गुन्हा घडला होता हैदराबाद मध्ये, ज्याचा मुंबई पोलिसांचा काहीही संबंध नव्हता. पण गुन्हा हा गुन्हा असतो आणि पोलिसांची त्यावर व्यवस्थित नजर असतेच. कोणताही पुरावा नसताना एका अंदाजावर सुरु झालेला हा तपास मुंबई पोलिसांना खऱ्या गुन्हेगार पर्यंत घेऊन गेला आणि कश्या प्रकारे त्यांनी हैदराबाद मध्ये झालेल्या चोरीच्या गुन्हेगाराला सापळा रचून मुंबईच्या एका बार मध्ये पकडले व सर्व माल कसा ताब्यात घेतला हे आपल्याला दिनांक १३ शुक्रवारच्या ९ च्या या भागात आपल्याला पहायला मिळेल.
सन २००९, जेरॉम सलढाणा नावाची व्यक्ती अचानक मिसिंग झाली. जेरॉम हा अतिशय हसरा खेळकर रिटायर्ड धनाढ्य व्यक्ती होता. त्याला मुंबईतील प्रॉपर्टी विकून गोव्याला सेटल व्हायचं होत. आणि अचानक ती व्यक्ती गायब झाली. पनवेल क्राईम ब्रँच च्या युनीट २ चे संतोष धनवडे यांच्या कडे हि केस आली. त्यांची शोधकार्य हात घेतले. पहिलाच क्लू जेरॉम ची स्कोडा गाडी मिळाली पण जेरॉम गायब होता. गाडीच्या स्टिअरिंगवर आणखी एका माणसाचे ठसे सुद्धा मिळाले पण नक्की काय झालं हे कळत नव्हते. हे शोधकार्य सुरु असतानाच जेरॉम च्या भावाच्या इ मेल आईडी वर शाह नावाच्या व्यक्तीचा इ मेल येतो कि त्याने जेरॉमची प्रॉपर्टी त्याने १.५० करोडला विकत घेतली आहे. पोलिसांच्या दृष्टीने हे सगळं विचित्र होत. ते शाह नावाच्या व्यक्तीच्या तपासाला लागतात. तपास करता करता पोलीस शाहपर्यंत कसे पोहचतात आणि जेरोमच्या खुनाच्या प्लॅन कसा सोडवला जातो याची चित्तरकथा शनिवारी दिनांक १४ ला रात्री ९ च्या या भागात आपल्याला झी युवावर पाहायला मिळेल.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.