आपल्याला सर्वांना माहितच आहे की सिनेसृष्टीत एकेकाळी आपल्या अदाकारीतून घायाळ करणाऱ्या तारकांची काही खासियत आणि खुबी ही वेगळीच होती. मुळात त्यांच्या सिनेसृष्टीतल्या कामाचा नव्वदीच्या दशकात रसिकप्रेक्षकांच्या मनावर प्रभाव इतका सुंदर पडला आहे की, त्याची जणू इतर कलाकारांना सरदेखील येणार नाही.
मुळातचं या अभिनेत्रींनी केवळ एक दशक गाजवलं असं नाही तर त्यांनी तमाम भारताच्या रसिकप्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण करत त्यांना आपल्या अभिनयाची आवड लावली. आणि ही बाब आपण खास आज याकरता सांगणार आहोत, त्याच कारण म्हणजे नव्वदीच्या या सौंदर्यतारका पुन्हा एकदा रसिकप्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होतं असल्याचं पहायला मिळतं आहे.
चला तर मग आता आपण जाणून घेऊयात नेमक्या कोणकोणत्या नव्वदीच्या अप्सरा आपले जलवे पडद्यावर पुन्हा दाखवणार. सर्वात आधी म्हणालं तर नीतू कपूर. नीतू कपूर अर्थातचं रणबीर कपूर याची आई. तिने बॉलीवुडमधे आजवर अनेक चांगल्या सिनेमांमधून आपल्या कामाची छाप उमटवली आहे.
नीतू कपूर पुन्हा पदार्पण करणार असल्याने अनेक चाहते फार उत्सुक असल्याचं पहायला मिळतं आहे. धर्मा प्रोडक्शन यांच्या अंतर्गत बनत असलेल्या जुग जुग जियो या सिनेमात नीतू कपूर पहायला मिळणार आहे. नीतूच्या भुमिकेसोबत अनिल कपूर तिच्या ओपोझीट पात्राच्या भुमिकेत दिसणार असल्याने ही केमिस्ट्री फार उत्तम असणारं याची चर्चा रंगली आहे.
नीतूशिवाय इतर म्हटलं तर भाग्यश्री ही अभिनेत्री देखील मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झाली आहे. भाग्यश्रीची लोकप्रियता त्या काळात अगदी अफाट होती. ती बराच काळ पडद्यापासून कायमच दूर राहिली आहे. तिच्या आता आगामी “थलाईवी” आणि “राधे श्याम” या दोन सिनेमांकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत.
राधे श्याम हा प्रभासचा सिनेमा असणार आहे. तर दुसरीकडे “थलाईवी” हा सिनेमा पुर्व मुख्यमंत्री राहिलेल्या दाक्षिणात्य जयललिता यांच्या जीवनावर आधारित आहे. आता भाग्यश्री त्यात कशा प्रकारे तिचं काम साकारते हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे.
मुळातचं प्रेक्षकांना जेव्हा समजलं की एकापेक्षा अधिक नव्वदीच्या अभिनेत्री पुन्हा सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत तेव्हा त्यांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरला नव्हता. खऱ्या अर्थानं आता एक नवं पर्व पहायला मिळेल. शिल्पा शेट्टी ही अभिनेत्री आजवर टिव्ही माध्यमातून सक्रीय राहिली होती.
परंतु आता तीदेखील मोठ्या पडद्यावर येणार असून तिने यासाठी आपलं कामही सुरू केल्याची चर्चा आहे. या वर्षी येणाऱ्या “निकम्मा” या सिनेमातून ती आपलं पुर्नपदार्पण करत आहे. तब्बल 14 वर्षांच्या मोठ्या गॅपनंतर शिल्पा मोठ्या रूपेरी पडद्यावर झळकणार आहे. या सिनेमात अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा पदार्पण करणार आहे तर दुसरीकडे प्रसिद्ध गायिका शर्ली सेतियाही यात तिचं पदार्पण साकारताना पहायला मिळेल.
यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे, आयशा जुल्का. आयशाने मागेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून काही नवे फोटोज शेअर करत तिच्या फिटनेसची खबर सर्वांना दिली होती. आयशा अजूनही तितकिच तरोताजा आहे जितकी ती पडद्यावर काही वर्षांपूर्वी आपल्याला पहायला मिळायची. “हश हश” या वेबसिरीजमधून ती तिचा कमबॅक साकारत आहे. आयशा जुल्काचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा म्हणजे, जो जीता वही सिंकदर हा होता.
आता बोलायंच म्हटलं तर ती अभिनेत्री म्हणजे, लारा दत्ता. अक्षय कुमारच्या थ्रिल आणणाऱ्या बेलबॉटम या सिनेमाचा लारा आता भाग झाली आहे. लाराचा कमबॅक एक दमदार पात्रासोबत होणार असल्याची सर्व चिन्हे दिसत असल्याने तिचा चाहतावर्ग प्रचंड खुशीत आहे. लारा याआधी बऱ्याच गॅपनंतर “वेलकम टू न्यूयॉर्क” या 2018 साली आलेल्या सिनेमात दिसली होती.
आता येते ती अभिनेत्री म्हणजे ईशा देओल. ईशा देओल बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिल्याची पहायला मिळाली. हेमा मालिनीची लाडक्या असलेल्या ईशाने तिच्या पुन्हा होणाऱ्या पदार्पणाच्या सिनेमाची शुटींगदेखील पुर्ण केल्याची माहिती मिळते आहे. मात्र काही कारणास्तव या सिनेमाच्या नावाची घोषणा होणं अजून बाकी आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!