क्रिकेट आणि बॉलिवूडचं नातं खुप घट्ट आहे. दोन्हीही आपापल्या जागेवर खुप लोकप्रिय आहेत. अनेक क्रिकेटपट्टू असे आहेत की त्यांचं बॉलिवूड अभिनेत्री यांच्यासोबत काही न काहीतरी प्रकरण चाललेलं असतं.

त्यांची ओळख कधी जाहिरात करताना होते तर कधी आकर्षनामधून. एखादा खेळाडु चांगला खेळ करू लागला आणि तो जगात फेमस झाला की मग त्यांचे बॉलिवूड प्रेम प्रकरणाची वाट चालु होते. कारण क्रिकेट हा सगळ्यात लोकप्रिय खेळ आहे.

जगातील करोडो चाहते या खेळाच्या प्रेमात आहेत. मोठ्या मॅचेस च्या वेळी तर भारतीय कलाकार मैदानात सपोर्ट करायला हजर असतात. मग त्यात अभिनेते ही असतात आणि अभिनेत्री सुद्धा. आज आपण क्रिकेट मधील लोकप्रिय खेळाडु महेंद्रसिंग धोनी चं असणारं बॉलिवूड कनेक्शन जाणुन घेणार आहोत.

एम एस, माही, फिनिशर, कॅप्टन कुल आणि महेंद्रसिंग धोनी अश्या अनेक नावांनी नामकरण झालेला धोनी हा खुप संयम असणारा खेळाडू आहे. आज तो यशाच्या शिखरावर जगात भारी आहे. म्हणजे खुप लोकप्रिय आहे.

जेव्हा एखादा खेळाडू जगात लोकप्रिय होतो तेव्हा तो बॉलिवूड च्या अभिनेत्री च्या प्रेमात किंवा अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहत नाही. महेंद्र सिंग धोनी आला आणि त्याने इतिहास निर्माण करायला सुरुवात केली.

तेव्हा त्याची ओळख झाली ती साऊथ ची सुपरस्टार अभिनेत्री राय लक्ष्मी सोबत. तिच्यासोबतच असणारं धोनीचं रिलेशन मीडिया वर खुप व्हायरल झालं होतं. ते खुप चर्चेत आले होते. काही काळानंतर मात्र दोघांचं पुन्हा विस्कटलं. राय लक्ष्मी ने धोनीला मनापासून स्वीकारलं होतं पण धोनीने खेळावर परिणाम होऊ नये म्हणुन त्यांच्या संबंधाला संमती दिली नाही.

धोनीचा खेळ प्रचंड लोकप्रिय होत होता. तो भारतीय लोकांच्या गळ्यातला ताईत खेळाडू बनला होता. पैसा आणि नाव दोन्हीही त्याच्याकडे आलं होतं. म्हणतात की गुळाला मुंग्या लागतातचं. धोनी गुळ झाला होता आणि बॉलीवूड अभिनेत्री मुंग्या.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि महेंद्रसिंग धोनी हे दोघे बऱ्याच काळापर्यंत रिलेशन मध्ये राहिले होते. अनेक वेळा दोघांनी एकमेकांना डेट केलेलं आहे. पुढे काही काळानंतर ते दोघेही एकमेकांना सोडुन विभक्त झाले.

साऊथ ची प्रसिद्ध अभिनेत्री आसीन आणि धोनी हे खुप वेळा एकमेकांनच्या सोबत दिसले होते. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आईपीएल च्या काळात दोघे खुप वेळा सोबत राहिले होते. पण नंतर काही कारणास्तव तेही वेगळे झाले.

महेंद्र सिंग धोनी हा भारताचा यशस्वी कॅप्टन राहिलेला आहे. अनेक पुरस्कार त्याने भारताला जिंकून देण्यासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. या काळात अनेक अभिनेत्री त्याच्या आयुष्यात आल्या; पण त्याचं कुणासोबतही फार दिवस गुण जुळले नाहीत.

पण एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीवर त्याचा जीव बसला. ती एका हॉटेल मध्ये रिसेप्शनला कामाला होती. साक्षी हे तिचं नाव. त्यांची ओळख झाली. मग ओळखीचं प्रेमात रूपांतर आणि प्रेमाचं लग्नात. आज धोनी साक्षी सोबत झारखंडमध्ये आपल्या घरी त्यांच्या मुलीसोबत आयुष्य जगत आहे. नुकताच त्याचा वाढदिवस होऊन गेला.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.