Morya Tuzya Namacha Gajar Song – Adarsh Shinde & Anandi Joshi

1523

आदर्श– आनंदी यांच्या आवाजात ‘मोरया –तुझ्या नामाचा गजर

सप्तसूर म्युझिक कंपनी निर्मित आणि मेघा घाडगे अभिनित “काटाकिर्रर्र” हे गाणं आपल्या चांगल्याच परिचयाचं आहे. आदर्श शिंदेयांच्या आवाजातील या गाण्याने गेल्या काही महिन्यातच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. अनेक मराठी सिनेमांमधून आपणआदर्श शिंदे यांच्या आवाजाची जादू अनुभवली आहे. ‘दुनियादारी’ या सिनेमातील “देवा तुझ्या गाभाऱ्याला” गाणं असो किंवा ‘दगडीचाळ’ मधील “मोरया” हे गाणं त्याच्या आवाजाने गाण्याला एक वेगळा साज येतो. “काटाकिर्रर्र” या गाण्याची निर्मिती सप्तसूर म्युझिककंपनीचे सर्वेसर्वा मंगेश मोरे यांनी केली असून आशिष मोरे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं होतं. “कुलदैवत महाराष्ट्राचे” हा सप्तसूरम्युझिक कंपनीचा पहिला वाहिला म्युझिक अल्बम असून यात १५ भक्तीपर गीते सादर करण्यात आली आहेत. खंडोबाचा मंत्र याम्युझिक कंपनीने पहिल्यांदा लोकांसमोर आणला आहे. यानंतर निर्मिती करण्यात आली ती “काटाकिर्रर” या म्युझिक सिंगलची.

काटाकिर्ररची हीच टीम आपल्यासाठी गणपतीची स्तुती सांगणार एक गाणं घेऊन येत आहे. गणपती हा आपल्या सगळ्यांचा लाडकाअसून त्याच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. “मोरया -तुझ्या नामाचा गजर” हे या गाण्याचे नाव असून नुकतंच या गाण्याचंरेकॉर्डिंग एन्झी स्टुडिओ येथे करण्यात आलं. “आदी तु अनंत तु तु गणनायका, शिवसुता गिरिजात्मजा तु गणनायका” असे यागाण्याचे बोल असून अमिताभ आर्य यांनी बोल लिहिले आहेत.

आशिष मोरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याचे गणेश सातार्डेकर संगीत संयोजन  केले आहे. गणपतीची स्तुती करणाऱ्या गाण्यातआदर्श शिंदे यांच्यासोबत आनंदी जोशी यांचादेखील आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. “दुनियादारी”, “डबल सीट”, “पिंडदान”, “नारबाची वाडी” यांसारख्या सिनेमातून आनंदी जोशींचा मंजुळ आवाज ऐकला आहे, तर आशिष मोरे यांनी शान, कुणालगांजावाला, जावेद अली, सुरेश वाडकर, अमृता फडणवीस यांसारख्या दिग्गज गायकांबरोबर काम केले आहे. आशिष मोरे यांचा “एकआमचा बाणा” हे महाराष्ट्राचं गौरवगीत असलेला गाणं नुकताच प्रदर्शित झालं असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या गाण्याला मिळालाआहे. गणेशाची स्तुती करणारं आदर्श- आनंदीच्या स्वरातील हे गाणं लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.