काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर दोन नावे खूप चर्चेत होती, ते म्हणजे मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर. कारण हीच दोन नावे लग्न करून एकत्र आलेली आहे. होय नुकतंच त्यांनी वैवाहिक जीवनाला सुरुवात केलेली आहे. पण तरीही मिताली आणि सिद्धार्थ चर्चेत आहेत. ते दोघे खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.

सोशल मीडियावर खुल्या पणाने त्यांनी त्यांचं प्रेम बाहेर आणलं होतं. आणि आता लग्न करून ते मोकळे झालेली आहेत. पण तरीही मितालीच्या इंस्टा अकाऊंट मुळे सोशल मीडियावर पुन्हा पोस्ट व्हायरल होत आहेत. ती गोष्ट नेमकं काय चला तर मग हेच सविस्तर रित्या जाणून घेऊयात.

 

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर या लोकप्रिय जोडीने नवीन वर्षात लग्नगाठ बांधली. २४ जानेवारी रोजी मोठ्या थाटामाटात या दोघांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विशेष म्हणजे कलाविश्वापासून ते चाहत्यांपर्यंत या लग्नाची चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यातच आता मितालीने लग्नानंतर तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्ये एक बदल केला आहे.

उत्तम अभिनय आणि निखळ हास्यामुळे अनेकांच्या मनावर राज्य करणारी मिताली कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. बऱ्याचवेळा तिने सिद्धार्थ आणि कुटुंबासोबतचे काही फोटो शेअरदेखील केले आहेत. मात्र, यावेळी तिने कोणताही फोटो किंवा व्हिडीओ शेअर केला नसून तिच्या सोशल मीडिया अकाऊंटमध्येच एक बदल केला आहे.

मितालीने सोशल मीडियावरील तिच्या नावात बदल केला आहे. मिताली मयेकर ऐवजी आता तिने मिताली मयेकर-चांदेकर असं नाव केलं आहे. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर लगेचच मितालीने तिचं नाव बदलल्यामुळे चाहत्यांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आहेत.

वैवाहिक जीवनाची सुरुवात ही खूप आनंददायी त्यांच्या साठी ठरणार आहे. कारण दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. या मराठी सेलिब्रिटी जोडीला पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा.