मित्रांनो!, सेलिब्रेटी… विशेषतः चित्रपट सृष्टीतील, हे शक्यतो नेहमीच त्यांच्या महागड्या लाईफस्टाइलमुळे चर्चेत असतात.मात्र असेही काही कलाकार आहेत. ज्यांनी अफाट यश मिळवलं असलं तरी  त्यांचे  पाय आजही जमिनीवरच आहेत. अशाच कलाकारांपैकी एक अभिनेता ज्याला पाहून प्रत्येकाला वाटतं की, असाच असावा मराठी मातीतला सुपरस्टार.

आणि ते नाव म्हणजे बॉलीवूड, टॉलिवूड तसेच मराठी चंदेरी दुनियेतील सुप्रसिद्ध मराठी अभिनेते सयाजी शिंदे. त्यांचे राहणीमान, वागणं यातील साधेपणा कायम आहे. आजही  ते सर्वसामान्य, साधेपणाने आयुष्य जगणेच पसंत करतात.

सयाजी शिंदे यांचे वृक्षप्रेम सर्वश्रूत आहे. यापूर्वीही त्यांनी वृक्ष लागवडीबाबत अनेक उपक्रम घेतले आहेत. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत व प्रत्येक गाव, तालुक्यातील सर्वात जुनी झाडे हेच त्या त्या भागातील आपले सेलिब्रेटी आहेत, आईनंतर वृक्ष आपल्याला ऑक्सिजन देऊन जगवतात, त्यामुळे आपण सर्वांनी प्रत्येकी पाच झाडे तरी लावून वाढवली पाहिजेत. प्रत्येक शाळेत, संस्थेत वृक्ष बँक सुरू व्हावी.

शाळा, कॉलेजच्या अभ्यासक्रमात पर्यावरण विषयाला महत्त्व आले पाहिजे. झाडांचे वाढदिवस साजरे व्हायला हवेत. गेली दोनशे, तीनशे वर्षे आपल्या अनेक पिढ्यांना ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे आपण ऋणी राहिले पाहिजे. धोरणकर्त्यांनी आता पर्यावरणाची हानी न करणारी धोरणे आखली पाहिजेत. विचार सगळे कपाटात बंद आहेत. आता प्रत्येकाने कृती करण्यास सुरुवात करायला हवी अशाप्रकारे आवाहन सयाजी शिंदे नेहमीच करताना दिसतात.

कोरोनाच्या काळात लोकांना ऑक्सिजनचे महत्त्व कळले. याची कमतरता जाणवू लागल्याने काय स्थिती होते, याची जाणीव झाली. झाडांच्या माध्यमातून मोफत मिळणाऱ्या आणि पैसे देऊनही न मिळणाऱ्या ऑक्सिजनबाबत सर्वांचेच डोळे उघडले. पण, तोपर्यंत डोळे पांढरे होण्याची वेळ अनेकांवर आली. कितीही पैसा आणि सुखसोयी असल्या तरी माणसाला शांती आणि समाधान हवे असते ते विकत मिळत नाही.

पण झाडाखाली बसला तर या दोन्ही गोष्टी मिळतात. कोट्यवधी रुपयांच्या गाडीत बसल्यानंतरही जेव्हा गाडीबाहेर उतरतो, त्यावेळी आपण गाडीही झाडाखाली लावायला सांगतो. मग पैसा महत्त्वाचा की झाड?, असा सवालही शिंदे यांनी विचारला आहे. दहा कोटींचा बंगला घेण्यापेक्षा झाड होऊन माळरानावर सावली द्या, अशा उत्कट भावना यावेळी सयाजींनी बोलून दाखवल्या.

सातारा जिल्ह्यात आतापर्यंत २५५ जवान शहीद झाले असून प्रत्येक जवानाच्या नावाने एक झाड ही संकल्पना राबवण्याची संकल्पना सयाजी शिंदे यांनी मांडली आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराईच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी याआधीही दुष्काळी भागात हजारो झाडे लावली आहेत.

श’ही’द जवानांच्या कुटुंबाकडून लावण्यात येणारे प्रत्येक झाड हे सातारा जिल्ह्यातील प्रत्येक जवानाची स्मृती जागृत करुन देणारे असल्याच्या भावना सयाजी शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या. देशातील पहिलं वृक्ष संमेलन सयाजी शिंदे यांनी बीड जिल्ह्यात आयोजित केले होते. विशेष म्हणजे या संमेलनाच्या अध्यक्षपदी वडाचे झाड होते. या संमेलनात सयाजी शिंदेनीही उपस्थितांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला होता.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.